Jump to content

वामन रामराव कांत

वा.रा. कांत
जन्म नाव वामन रामराव कांत
टोपणनाव रसाळ वामन, अभिजित, आणि कांत
जन्मऑक्टोबर ६, १९१३
नांदेड, महाराष्ट्र, भारत
मृत्यूसप्टेंबर ८, १९९१
मुंबई ,महाराष्ट्र,भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता, समीक्षा , अनुवाद, नाट्यलेखन
अपत्ये ३ मुले २ मुली

वामन रामराव कांत (ऑक्टोबर ६, १९१३ - सप्टेंबर ८, १९९१) हे मराठी कवी, गीतकार होते.

जीवन

वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.

नोकरी व्यवसाय

  1. 'विहंगमाला' या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
  2. निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
  3. निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
  4. भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
  5. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)

गाजलेल्या कविता/गाणी

  • आज राणी पूर्विची ती प्रीत तू मागू नको
  • त्या तरुतळी विसरले गीत
  • बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
  • राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्‍न माझे ?
  • सखी शेजारिणी, तू हसत रहा; हास्यांत पळे गुंफीत रहा

काव्यसंग्रह(एकूण १० )

  • 'दोनुली'
  • ’पहाटतारा’
  • ’बगळ्यांची माळ’
  • 'मरणगंध' (नाट्यकाव्य)
  • 'मावळते शब्द'
  • 'रुद्रवीणा'
  • 'वाजली विजेची टाळी'
  • 'वेलांटी'
  • ’शततारका’ (१९५०)
  • ’सहज लिहिता लिहिता’

चरित्र

वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -’कविवर्य वा.रा.कांत’- कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.


पुरस्कार

  1. १९६२-६३ 'वेलांटी ' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  2. १९७७-७८ 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
  3. १९७९-८० ' दोनुली' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
  4. १९८९-९० 'मावळते शब्द' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार

सन्मान

  1. १९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
  2. १९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
  3. १९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान

.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
पहाटताराकवितासंग्रहविचाराविहार मंडळ प्रकाशन, नांदेड१९३०
फटत्कारकवितासंग्रहविचाराविहार मंडळ प्रकाशन,नांदेड१९३३
रुद्रवीणाकवितासंग्रहप्रतिभा प्रकाशन , औरंगाबाद१९४७
शततारका कवितासंग्रहधृव प्रकाशन, परभणी१९५०
वेलांटीकवितासंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९६२
वाजली विजेची टाळीकवितासंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९६५
मरणगंध नाट्यकाव्यकाँटिनेंटल प्रकाशन, मुंबई१९७६
दोनुली काव्यसंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९७९
मावळते शब्द काव्यसंग्रहमौज प्रकाशन, मुंबई१९८८

बाह्य दुवे