Jump to content

वाचन

वाचणे हा एक उत्तम छंद आहे. वाचन वेगवेगळया भाषेत करता येते. मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते. मराठीतून वाचन करण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात 'वाचाल तर वाचाल' अशी म्हण प्रचलित आहे. संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार झाला असून वच म्हणजे बोलणे, आणि वाच म्हणजे बोलावयास लावणारे. अर्थात वाचन असेल तरच वचनात सक्षमता येऊ शकते, हे खरे.

वाचनाचे महत्त्व :

१.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन.

२.वाचनामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो.

३.वाचनाने वाणीवर सुसंस्कार होतात.

४.वाचनाने सौदर्यबोध व आनंदबोध साध्य होतात.

५.वाचन क्षमतेचा परिपूर्ण विकास हा त्यातुन निघणाऱ्या अर्थनिष्पतीवर अवलंबून असतो.

६.वाचनामुळे भाषा शुद्ध होते व विचारांची देवाणघेवाण होते व आधीच द्यानची भर पडते.

२.वाचनाची प्रमुख उद्दिष्टे :

१.ज्ञान प्राप्ती :ग्रंथाचे व इतर पुस्तकाचे वाचन केल्यामुळे ज्ञान प्राप्ती होते.

२.आनंदप्राप्ती :आनंदप्राप्तीसाठी उत्तम साहित्याचे वाचन करावे.

३.संस्कार :व्यक्तीच्या मनावर चांगले संस्कार वाचनातून होतात.

४.रसास्वाद :कथा,काव्य,कादंबऱ्या ,नाटके ,यातून रसग्रहण दृष्टी लाभते.

५.आनंदवृत्ती :वाचनामुळे मन आनंदाच्या अनुभुतीने भरून जाते.

३.वाचनाची पूर्वतैयारी करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :

१.शारीरिक तयारी :

१.वाचन कौशल्याची शरीरातील ज्ञानेंद्रिय परिपक्व व्हायला हवीत.

२.श्वासावर ताबा असावा.

२.भावनिक तयारी :

१.आवाजात चढ-उतार करण्याची क्षमता यावी.

२.भावनिक समतेसाठी मनाची तयारी हवी.

३.बौद्धिक तयारी :

१.व्यक्ती,वस्तु,स्थल,प्रसंग यांचा सहचर्य समजण्याची क्षमता असावी.

२.मेंदूची संदेश ग्रहण करण्याची तयारी असावी.

४.वाचनाचे प्रकार :

१.प्रगट वाचन :अक्षर ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात.

प्रगट वाचनाचे प्रकार

१.सस्वर वाचन :-स्ववासासाठी केलेल विद्यार्थाने ;वाचन त्यास सस्वर वाचन म्हणतात.

२.सुस्वर वाचन :-विद्यार्थासाठी शिक्षकाने केलेले वाचन यास सुस्वर वाचन म्हणतात.

२.मुकावचन :लिखित अथवा मुद्रित अक्षर रूप डोळ्याने मेंदूने अर्थग्रहण करणे.

मुकवाचन प्रकार :

१.संदर्भ वाचन :संदर्भ पुस्तकाचे वाचन करणे.

२.सखोल वाचन :एखाद्या ग्रंथाचे वाचन करणे.

३.विस्तृत वाचन :-काव्य,नाटक,मासिके वाचन.

३.गतीवाचन :योग्य गतीने वाचन करण्यास गती वाचन म्हणतात.

५.प्रगट वाचनाचे शिक्षणातील महत्त्व :

१.उच्चार स्पष्टता :संयुक्त स्वराचे व व्यंजनाचे उच्चार अचूकपणे करणे.

२.ओघ व अस्खलितपणा :एक शब्द किंवा अनेक शब्दाचे योग्य शब्दसमूह करून वाचन करणे.

३.स्वाभाविकता:-वाचन बोलण्यासारखे व्हावे .

४.भावपुर्णता :चेहऱ्यावर हवभाव व आवाजात चढउतार करावा.

६.मुकवाचनाचे शिक्षणातील महत्त्व :

१.स्वतंत्रपणे आशय समजुत देणे:-

मनोगत वाचन हा प्रगट वाचनाचा प्राण आहे तो स्वतंत्रपणे आशय समजावुन देतो .

२.गती-संगती प्रगती साधने :वाचनाची गती वाढवणे व वाचलेल्याची संगती ओळखणे.

३.यथार्थता :-लेखनाच्या अनुभुतीचा साक्षात्कार पुर्णपणे आपल्याला मुकवाचाने होतो.

७.प्रगटवाचन व मुकवाचनातील फरक :

१.अक्षर रूप ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात व लिखित अथवा मुद्रित अक्षर डोळ्याने पाहून नंतर मेंदूने अर्थग्रहण करण्यास मुकवाचन म्हणतात .

२.प्रगट वाचनाचे सस्वर वाचन व सुसस्वर वाचन दोन प्रकार आहेत व मुकवाचनाचे संदर्भवाचन सखोलवाचन विस्तृत वाचन होण्यास मदल होते.

३.प्रगट वाचनचे शक्षणात उच्चार स्पष्टता ,ओघव अस्खलीतपणा ,स्वाभाविकता भावापुर्णता साधन येते व मुकवाचनाने शिक्षणात स्वतंत्रपणे आशय समजावून देणे,गती संगती प्रगती साधने ,यथार्थता इत्यादी गुण येतात.

४. प्रगट वाचन भाव व विचाराचे प्रगटीकरणकरण होते .व मुकवाचनने शांतता व चीतंशीलता या वृत्तीची जोपासणा करता येते.

५.प्रगट वाचन इतरांना आनंद देते व मुकवाचन स्वान्त सुखाय असते .

६.प्रगटवाचनाचा वेग कमी असतो व मुकवाचनाचा वेग अधिक असतो .

८.वाचनातील दोष व त्यावर उपाय :

१.अस्पष्ट आवाजात वाचन करणे :-दैवत-देवत.

२.चुकीचे उच्चारण : श,ष,स.

३.उच्चार भेदाचे अज्ञान वाचा व दृष्टीदोष .

४.वाचनातील अशुद्धता :तीर्थ ,तीर्थ.

५.अपूर्ण शब्द उच्चारण .

६.अडखळत वाचणे हेलकाढून वाचणे .

७.चुकीच्या जागी शब्द तोडून वाचणे.

८.शब्द गाळणे नवीन शब्द टाकून वाचन करणे.

९.वाचन कौशल्यात शारीरिक व्यंगामुळे निर्माण झालेल्या उणीवा व उपाय .

नाक,कान,डोळा,जिव्हा,दात :-डॉक्टर कडून करणे.

१०.वाचनातील योग्य आसनबंध :

१.पाठीचा कणा ताठ असावा.

२.प्रकाश डावीकडून यायला हवा.

३.दृष्टीच्या पातळीशी ४० अंश कोन करणे.

४.पुस्तक व नजर यात ९ ते १२ इंच अंतर आहे.

५.झोपुन वाचणे घातक आहे.

६.पुस्तक वाचताना संपूर्ण उघडणे डावाहात खाली ठेवणे.

७.इतर काम करतांना पुस्तक वाचू नये.

८.उभे राहून पुस्तक वाचतांना दोन्ही पायावर सरळ भार द्यावे .

११.निकोप वाचन सवयी :

१.पुस्तकावर खुणा करू नये.

२.पुस्तकाला कव्हर घालावी .

३.वाचलेल्या पुस्तकातील मुद्दे वहीत नोंदवी .

४.दुसऱ्याचे अथवा ग्रंथालयाचे पुस्तक वेळेवर नेऊन द्यावे.

५.वाचनलेले पुस्तक कपाटात बंद करू ठेवावे.

६.वाचलेल्या पुस्तकावर स्वताचा अभिप्राय तयार करणे.

१२.वाचन कौशल्य विकासाठी उपक्रम :

१.भिन्न-भिन्न प्रकारचे वाचन तक्ते दाखवणे अर्थ स्पष्ट करणे.

२.कार्डस ,कृतीदर्शक चित्रे दाखवणे.

३.टेपरेकॉर्डरच्या माध्यमातुन स्पर्धा घेणे .

४.भाषेचे खेळ व पाठांतर स्पर्धा घेणे.

५.भेंड्या व व्याकरणाचे खेळ घेणे .

६.अवांतर वाचन करायला लावणे.

१३.परिणामकारक वाचन कौशल्याची वैशिष्टे :

१.सुस्पष्ट वाचन : प्रत्येक अक्षराचा व शब्दाचा उच्चार सुस्पष्ट होणे आवश्यक आहे.

२.योग्य आरोह -आवरोह : उतार –चढाव होय.

३.स्वराघात : स्वरावर जोर देणे.

४.गती :योग्य गतीने वाचन करणे.

५.लय : काव्य वाचनाचे महत्त्वाचे लक्षण लय आहे.

६.योग्य हवाभाव :-डोळे ,भुवया ,मान,हाताची हालचाल.