वाघाडी (डहाणू)
?वाघाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच /उपसरपंच | प्रशांत सातवी /विजेंद्र कोल्हा |
बोलीभाषा | वारली,आगरी,वाडवळी. |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
वाघाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
लोकजीवन
येथे मुख्यतः आदिवासी समाजाची वस्ती आहे. आदिवासी जमातीत शुभ प्रसंगी तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविले जाते. आदिवासी समाजातील ठराविक लोक हे तारपा वाजवणारे असतात आणि त्यांना तारपाकरी नावाने ओळखले जाते.तारपाकरी लोकांची संख्या कमी होत आहे. येथील सचिन सातवी ह्यांनी आयुष संस्थेतर्फे तारपा वाद्यांची निर्मिती आणि तारपा वाजविण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करायला सुरुवात केली आहे. तारपा हे पालघर या आदिवासी जिल्ह्याचा मानबिंदू आहे. लग्नसोहळा, विविध महोत्सव, कौटुंबिक कार्य इत्यादी कार्यक्रमात तारपा नृत्य संगीत सादर केले जाते.[१]
पर्यटनस्थळ
येथे भीमबांध नावाचे आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थान आहे. येथील नदीच्या पात्रातील घाटांची स्वच्छता व सुशोभीकरण करून दगडांवर वारली शैलीतील कलाकृती रेखाटल्या आहेत.[२]
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036