Jump to content

वसुधा धगमवार

डॉ. वसुधा वासंती धगमवार (१९४० - २०१४) या एक वकील, विद्वान, संशोधक, लेखक आणि कार्यकर्त्या होत्या.[] त्या मल्टिपल ॲक्शन रिसर्च ग्रुप (मार्ग)च्या संस्थापक संचालक होत्या. मथुरा बलात्कार प्रकरणाच्या संदर्भात १९७९ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला मथुरा ओपन लेटरवर चार स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक होत्या. या केसने लैंगिक विरोधात राष्ट्रीय चळवळ उभी करण्यास मदत केली.[]

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

त्यांची आई, गीता साने, या लेखिका आणि स्त्रीवादी होत्या. त्यांचे वडील नरसिंह धगमवार हे वकील होते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. त्यांनी इंडियन लॉ सोसायटीच्या लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.[] त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजकारणात पदवी, मुंबई विद्यापीठातून एलएलबी आणि स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून कायदेशीर इतिहासात पीएच.डी केली.[]

कारकीर्द

असुधा धगमवार हे प्रोफेसर उपेंद्र बक्षी, प्रोफेसर लोटिका सरकार आणि रघुनाथ केळकर यांच्यासह १९७९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेल्या खुल्या पत्रावर स्वाक्षरी करणारे होते. त्याला मथुरा ओपन लेटर म्हणतात. मथुरा बलात्कार प्रकरणात[] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ते पत्र स्वीकारले. नंतर ही एक ऐतिहासिक केस बनली.[][] भारतातील लिंग-आधारित हिंसाचाराच्या मुद्द्यावर सतत चाललेल्या मोहिमेचा हा प्रमुख मुद्दा बनला.[][][][]

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी आदिवासी हक्क आणि कायद्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील अक्राणी आणि अकलकुवा या अंतर्गत आदिवासी पट्ट्यात प्रवास केला आणि काम केले.[] १९८२ मध्ये त्यांची अशोक फेलो म्हणून निवड झाली.[१०]

स.न. १९८५ मध्ये त्यांनी मल्टिपल ॲक्शन रिसर्च ग्रुप (मार्ग)ची स्थापना केली. हा एनजीओ दिल्ली येथे आहे. ज्यामध्ये कायदेशीर जागरूकता, वकिली आणि जनहित याचिकांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.[][११]

त्यांनी मिरांडा हाऊस, दिल्ली आणि पुणे विद्यापीठाच्या कायदा विभागात अध्यापन केले.[]

वसुधा विस्थापित लोकांच्या हक्कांसाठी,[१२] कैद्यांसाठी आणि कायदेशीर पुस्तिका प्रकाशित करण्यासाठी त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात.[१३]

त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या कायदेशीर तज्ञ समितीच्या सदस्या आणि कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्हच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या होत्या.[]

त्यांनी कोठडीतील हिंसाचार आणि छळ यासंबंधी अनेक खटलेही दाखल केले.[१४]

संदर्भ

  1. ^ "Dr. Vasudha Dhagamwar – Oral History Narmada" (इंग्रजी भाषेत). 2021-10-25 रोजी पाहिले.
  2. ^ a b Dutta, Debolina; Sircar, Oishik (2013). "India's Winter of Discontent: Some Feminist Dilemmas in the Wake of a Rape". Feminist Studies. Feminist Studies, Inc. 39 (1): 293–306. 31 October 2021 रोजी पाहिले. The letter served as the foundation for mobilizing protests and a nationwide campaign to demand changes in rape law.
  3. ^ a b c Byatnal, Amruta (2014-02-14). "Vasudha Dhagamwar dead". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-10-26 रोजी पाहिले.Byatnal, Amruta (2014-02-14). "Vasudha Dhagamwar dead". The Hindu. ISSN 0971-751X. Retrieved 2021-10-26.
  4. ^ Dhagamwar, Vasudha Vasanti (1972). Safeguards of Liberty in the Indian Penal Code: Theory and Practice (phd thesis) (इंग्रजी भाषेत). SOAS University of London.
  5. ^ a b Roy, Anupama (September 2014). "Critical Events, Incremental Memories and Gendered Violence". Australian Feminist Studies. 29 (81): 238–254. doi:10.1080/08164649.2014.959161. [...] called the 'Mathura Open Letter', questioned the manner in which the Supreme Court had interpreted 'consent' and failed thereby in its constitutional duty of protecting the dignity of Mathura [...] The rape law was subsequently amended in 1983—the first time in independent India since it was enacted in 1860 by the colonial state—to make consent, and by implication the woman's past, irrelevant for establishing the veracity of the woman's claim of having been raped.
  6. ^ a b c Latkar, Ketaki (February 11, 2014). "Activist Vasudha Dhagamwar dies". Pune Mirror. 30 October 2021 रोजी पाहिले.
  7. ^ Iyer, Kavitha (January 6, 2013). "Delhi gang-rape: 'Track down cars that didn't stop to help'". DNA. 31 October 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Obituary: Vasudha Dhagamwar (1940 -2014) – Feministsindia" (इंग्रजी भाषेत). 2021-10-25 रोजी पाहिले.
  9. ^ Oral History, Narmada. https://oralhistorynarmada.in/early-history-of-the-movement/dr-vasudha-dhagamwar-interview/. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ "Vasudha Vasanti Dhagamwar | Ashoka | Everyone a Changemaker". www.ashoka.org (ग्रीक भाषेत). 2021-10-25 रोजी पाहिले.
  11. ^ "Multiple Action Research Group (MARG)". Multiple Action Research Group (इंग्रजी भाषेत). Legal Literacy NGO in Delhi. 2021-10-25 रोजी पाहिले.
  12. ^ "MARG Board Members | Ligal Literacy in Delhi, India". Multiple Action Research Group (इंग्रजी भाषेत). 2021-10-25 रोजी पाहिले.
  13. ^ "RIP- Dr. Vasudha Dhagamwar, A legal researcher, scholar and activist - Kractivism" (इंग्रजी भाषेत). 2021-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-26 रोजी पाहिले.
  14. ^ Kadra Pehediya and Ors v State of Bihar, Supreme Court of India 1980, (1981) 3 SCC 671. "Kadra Pehadiya And Ors. vs State Of Bihar on 17 December, 1980". Livelaw. 26 October 2021 रोजी पाहिले.