Jump to content

वसुंधरा राजे शिंदे

वसुंधरा राजे शिंदे

कार्यकाळ
१३ डिसेंबर २०१३ – ११ डिसेंबर २०१८
मागील अशोक गेहलोत
मतदारसंघ झालरापटन
कार्यकाळ
८ डिसेंबर, इ.स. २००३ – ८ डिसेंबर, इ.स. २००८
राज्यपाल कैलाशपती मिश्रा
मदनलाल खुराना
टी. व्ही. राजेश्वर
प्रतिभा पाटील
अखलाकर रेहमान किडवई
एस्. के. सिंग
मागील अशोक गेहलोत
पुढील अशोक गेहलोत

जन्म ८ मार्च, १९५३ (1953-03-08) (वय: ७१)
मुंबई, महाराष्ट्र,भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती हेमंत सिंग
धर्म हिंदू

वसुंधरा राजे शिंदे (राजस्थानी : वसुंधरा राजे सिंधिया; ८ मार्च १९५३) ह्या भारतामधील राजस्थान राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ह्यापूर्वी डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००८ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.

बालपण आणि शिक्षण

[ संदर्भ हवा ] वसुंधरा राजेंचा जन्म ८ मार्च १९५३ रोजी मुंबईमध्ये झाला. विजयाराजे शिंदे आणि ग्वाल्हेरचे महाराजा जिवाजीराव शिंदे यांच्या कन्या आहेत. ग्वाल्हेरच्या मराठा राजघराण्याच्या त्या वारसदार आहेत. त्यांचे शालेय शिक्षण प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट, कोडाईकॅनल,तामिळनाडू येथे झाले. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी शिक्षण घेतले.

राजकीय कारकीर्द

१९८२ मध्ये वसुंधरा राजेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांच्या राजकारणातील सहभागात त्यांची माता विजयाराजे सिंधिया यांची निर्णायक भूमिका होती. भारतीय जनता पक्षात अनेक संघटनात्मक पदे सांभाळल्यानंतर १९८५ मध्ये त्या राजस्थानच्या विधानसभेवर निवडून गेल्या. १९८९ पासून सलग चार वेळा झालावाड, राजस्थान मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेल्या.

वैयक्तिक आयुष्य

पूर्व राजस्थानमधील ढोलपूरच्या राजघराण्यातील हेमंत सिंग यांच्यासोबत १७ नोव्हेंबर १९७२ रोजी त्यांचा विवाह झाला. विवाहपश्चात एका वर्षातच त्या विभक्त झाल्या.आपल्या निवडणुक प्रचारादरम्यान अनेकदा ढोलपूरच्या जाट राजघराण्यासोबत असलेल्या संबंधांचा त्यांनी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या झालावाड मतदारसंघातून त्यांचे पुत्र दुष्यंत सिंग निवडून आले.

बाह्य दुवे