वसमत विधानसभा मतदारसंघ
बसमत विधानसभा मतदारसंघ - ९२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बसमत मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील १. वसमत तालुका आणि २. औंढा (नागनाथ ) तालुक्यातील जवळाबाजार आणि साळना ही महसूल मंडळे समावेश होतो. बसमत हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे हे बसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | जयप्रकाश शंकरलाल मुंदडा | शिवसेना | |
२००९ | जयप्रकाश रावसाहेब दांडेगावकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
बसमत | ||
उमेदवार | पक्ष | मत |
जयप्रकाश रावसाहेब दांडेगावकर | राष्ट्रवादी | ८१,३५७ |
जयप्रकाश मुंदडा | शिवसेना | ७८,५१३ |
उज्ज्वल विजयप्रकाश तांभाळे | अपक्ष | ९,०५९ |
शकीर मुजाहदे इस्माइल शेख | बसपा | २,९८३ |
क्रांतिसिंह ॲड. सुभाषराव शिंदे | अपक्ष | १,५३८ |
देवीप्रसाद मुंजाजी ढोबळे | स्वभाप | १,५२७ |
अॅड. दीपक किशनराव सदावर्ते | भाबम | १२,५० |
कैलाश बंसी निकाळजे | अपक्ष | ८२० |
गणेशराव किशनराव पडघण | रिपाई (A) | ५४९ |
प्रेमबाई नंदकिशोर जयस्वाल | अपक्ष | ४२९ |
ॲड. रत्नमाला नारायण आळणे | अपक्ष | २९८ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वसमत विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.