Jump to content

वसंत पोतदार

वसंत गोविंद पोतदार (जन्म : जबलपूर, ६ सप्टेंबर, इ.स. १९३७; - नाशिक, ३० एप्रिल. इ,स, २००३) हे मराठी लेखक, कथाकथनकार आणि स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार आहेत. पोतदारांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले. नंतर ‘सेर शिवराज’ (शिवाजी), ’एका पुरुषोत्तमाचा गाथा (पु.ल. देशपांडे), ‘योद्धा संन्यासी’ (विवेकानंद), महात्मा फुलेंसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांवर आधारले एकूण १० हिंदी-बंगाली-मराठी एकपात्री नाट्यप्रयोग करत ते ४० वर्षे देशात आणि परदेशांतही फिरले.

वसंत पोतदारांनी मराठी, हिंदी आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले आहे.

वसंत पोतदार यांची प्रसिद्ध पुस्तके

  • अग्निपुत्र : चंद्रशेखर आझाद, जतींद्रनाथ दास, बटुकेश्वर दत्त्त, राजगुरू, सुखदेव अन् भगतसिंग यांचेबद्दल साद्दंत नेमकी माहिती येथे मिळते. माहोर, मलकापूरकर अन् वैशंपायन असे अज्ञात वीरहि ज्ञात होतात.
  • अजब आजाद मर्द मिर्झा गालिब
  • अनिल विश्वास ते राहुल देव बर्मन
  • तोची साधू ओळखावा : गाडगे महाराजांचे चरित्र
  • एका पुरुषोत्तमाची गाथा : (पु.ल. देशपांडे यांचे चरित्र
  • एकोणीसशे एक
  • कुमार : कुमार गंधर्वांविषयीचे पुस्तक
  • गाडगे महाराज -अनोख्या समाजसुधारकाची रसाळ कहाणी
  • नाझी भस्मासूर
  • नाळ
  • पुन्हा फिरस्ता
  • पं. भीमसेन जोशी (२०१२)
  • भीमसेन (२००२)
  • मिर्जा गालिब
  • योद्धा संन्यासी - विवेकानंद
  • रामबाग टोळी (कथासंग्रह)
  • वंदे मातरम (कथासंग्रह, १९६९)
  • वेध : मराठी नाट्यसंगीताचा

वसंत पोतदार यांचे एकपात्री नाट्यप्रयोग

  • वंदे मातरम
  • आक्रंदन एका आत्म्याचे
  • महात्मा फुले
  • योद्धा संन्यासी
  • सेर सिवराज

वसंत पोतदारांविषयीची पुस्तके

  • वसंत पोतदार एक असाधारण गद्य शिल्पी (हिंदी, लेखक - विजय बहादुर सिंह)


पुरस्कार

  • ’नाळ’ला मसापचा पुरस्कार
  • ’योद्धा संन्यासी’ला मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार
  • ’कुमार’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार