Jump to content

वसंत कुंभोजकर

प्रा. वसंत अनंत कुंभोजकर (८ मार्च, १९२८) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक होते. प्रत्येक प्रश्नामागे सत्य असले तरी त्या प्रश्नाला दुसरी बाजू असते असे त्यांचॆ मत होते. 'लोकमत'चे तत्कालीन संपादक महावीर जोधळे यांना ते त्यांच्या अग्रलेखात मांडलेल्या मताची दुसरी बाजू ऐकवत. त्यांनी सुचवल्याप्रमाणे कुंभोजकरांनी लोकमत दैनिकात दुसरी बाजू नावाचे सदर लिहायला सुरुवात केली. त्या लेखांचा संग्रह 'टाॅस' नावाच्या पुस्तकात आहे.

पुस्तके

  • टाॅस ('दुसरी बाजू' या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह)
  • धूपदान
  • नजराणा
  • पर्याय
  • रसीला
  • रुसवा
  • विद्याश्री (गुरुवर्य वि.वि. चिपळूणकर गौरव ग्रंथ)
  • वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय
  • शिकार (कथासंग्रह)
  • शेफालिका. (कथासंग्रह). राजा बढे यांचे याच नावाचे एक पुस्तक आहे)
  • सकल सुखाचा एकच मंत्र