Jump to content

वसंत कानेटकर

वसंत कानेटकर
जन्म नाव वसंत शंकर कानेटकर
जन्ममार्च २०, इ.स. १९२२
रहिमतपूर जि .सातारा
मृत्यूजानेवारी ३१, इ.स. २००१
नाशिक
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र नाटककार, लेखक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटके, कादंबऱ्या
विषय मराठी
वडील शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश )

प्रा. वसंत शंकर कानेटकर (जन्म : रहिमतपूर, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, २० मार्च १९२२; - ३१ जानेवारी २००१) हे मराठी नाटककार होते.

जीवन

कानेटकरांचा जन्म मार्च २०, इ.स. १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. मराठी भाषेतील कवी गिरीश त्यांचे वडील होते. नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांचे अखेरपर्यंत वास्तव्य नाशिक येथील ‘शिवाई’ बंगला येथे होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.पी.टी. महाविद्यालयात (हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात) ते प्राध्यापक होते.[]

प्रकाशित साहित्य

कानेटकरांनी ४३ नाटके व ४ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची नाटके व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी झाली.

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अखेरचा सवालनाटक
अश्रूंची झाली फुलेनाटकपॉप्युलर प्रकाशन
आकाशमिठीपरचुरे प्रकाशन
आनंदीबाई आणीबाणी पुकारतातएकांकिकामनोरमा प्रकाशन
इथे ओशाळला मृत्यूनाटक
एक रूप- अनेक रंगनाटक
कधीतरी कोठेतरीनाटक
कवी आणि कवित्वधी गोवा हिंदू असोसिएशन
कस्तुरीमृगनाटक
गगनभेदीनाटक
गरुडझेपनाटकसहलेखक रणजित देसाईमेहता प्रकाशन
गाठ आहे माझ्याशीनाटक
गोष्ट जन्मांतरीचीनाटकपॉपुलर प्रकाशन
छू मंतरनाटकमजेस्टिक प्रकाशन, पॉपुलर प्रकाशन
झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू, अंबू, विठानाटकपॉप्युलर प्रकाशन
जिथे गवतास भाले फुटतातनाटकपरचुरे प्रकाशन
तुझा तू वाढवी राजानाटकपॉप्युलर प्रकाशन
तू तर चाफेकळीनाटक
देवांचे मनोराज्यनाटक
दोन ध्रुवांवर दोघे आपणनाटक
नलदमयंतीनाटकपरचुरे प्रकाशन
पंखांना ओढ पावलांचीनाटककाँटिनेंटल प्रकाशन
प्रिय आईसनाटक
प्रेमाच्या गावा जावेनाटकपॉपुलर प्रकाशन
प्रेमात सगळंच माफ !नाटकमेहता प्रकाशन
प्रेमा तुझा रंग कसानाटकपॉप्युलर प्रकाशन
फक्त एकच कारणनाटक
बेइमाननाटक
मत्स्यगंधानाटक
मदनबाधानाटक
मद्राशीने केला मराठी भ्रतारएकांकिकापॉप्युलर प्रकाशन
मला काही सांगायचंयनाटकपॉप्युलर प्रकाशन
माणसाला डंख मातीचानाटक
मास्तर एके मास्तरनाटक
मीरा...मधुरानाटक
मोहिनीनाटक
रंग उमलत्या मनाचेनाटकपरचुरे प्रकाशन
रायगडाला जेव्हा जाग येतेनाटकपॉप्युलर प्रकाशन
लेकुरे उदंड झालीनाटक
वादळ माणसाळतंयनाटकपॉप्युलर प्रकाशन
विषवृक्षाची छायानाटकपॉप्युलर प्रकाशन
वेड्याचं घर उन्हातनाटक
शहाण्याला मार शब्दांचाएकांकिकापरचुरे प्रकाशन
शिवशाहीचा शोधपरचुरे प्रकाशन
सुख पाहतानाटकपरचुरे प्रकाशन
सूर्याची पिल्लेनाटक
सोनचाफानाटकपरचुरे प्रकाशन
हिमालयाची सावलीनाटकपॉप्युलर प्रकाशन

कानेटकरांच्या नाटकांचे हिंदी अनुवाद(क)

  • अश्रूंची झाली फुले - आंसू बन गये फूल (सुनीता कट्टी, १९८०)
  • कस्तुरीमृग - चेहरों का पुरुष (डाॅ. कुसुम कुमार बिन, १९७७)
  • गगनभेदी - गगनभेदी (प्रशांत पांडे)
  • गाठ आहे माझ्याशी - मुकाबला मुझसे है (पद्मा नलगंडवार, १९८५)
  • गाठ आहे माझ्याशी - टक्कर मुझसे है (सरोजिनी वर्मा, १९८३)
  • प्रेम तुझा रंग कसा? - ढाई आखर प्रेम का (वसंत देव, १९६५)
  • प्रेमाच्या गावा जावे - प्रेम नगरिया जाना है (?)
  • मला काही सांगायचं आहे - मुझे कुछ कहना है (डाॅ. सुधाकर कलावडे, १९८०)
  • मत्स्यगंधा - मत्स्यगंधा (?)
  • रायगडाला जेव्या जाग येते - जाग उठा है रायगढ (वसंत देव, १९६४)
  • वेड्याचं घर उन्हात - जंजीर (सीमा विश्वास, १९६४)
  • वेड्याचं घर उन्हात - धूप के साये (वसंत देव, १९६४)

कानेटकरांच्या नाटकांचे गुजराती अनुवाद(क)

  • अखेरचा सवाल - अमे बरफना पंखी (१९७५)
  • अश्रूंची झाली फुले - आतमने ओझलमां राखमा (?)
  • गोष्ट जन्मांतरीची - पुनर्मिलन (अनिल मेहता, १९७९)
  • घरात फुलला पारिजात - पारिजात (?)
  • प्रेमा तुझा रंग कसा? - पढो रे पॊपट बोल प्रेमना (चंद्रिका लालू शहा)
  • मला काही सांगायचं आहे - ऊपर गगन नीचे धरती (१९७९)
  • रायगडला जेव्हा जाग येते - रायगड ज्यारे जागे छे (?)
  • हिमालयाची सावली - नोखी माटी ने नोखा मानवी (तारक मेहता, १९७२)

कानेटकरांच्या नाटकांचे कानडी अनुवाद(क)

  • अश्रूंची झाली फुले - सत्यं वद धर्मं चर (श्री. सेलूर, १९६२)

जीवन नाट्ये

वसंत कानेटकरांनी हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर कस्तुरीमृग, बाबा आमटे यांच्या जीवनावर वादळ माणसाळतंय, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्या जीवनावर विषवृक्षाची छाया आणि महर्षी कर्वे आणि बायो यांच्या जीवनावर हिमालयाची सावली ही नाटके लिहिली.

संगीत नाटक

वसंत कानेटकरांच्या कादंबऱ्या

  • घर (वसंत देवांनी या कादंबरीचा हिंदी अनुवाद केला आहे.)
  • तिथे चल राणी
  • पंख
  • पोरका
  • मी... माझ्याशी
  • रमाई

वसंत कानेटकरांच्या नाट्यलेखनापूर्वीच्या प्रसिद्ध कथा (या दोन कथांच्या मिश्रणातून 'वेड्याचे घर उन्हात' हे नाटक सिद्ध झाले).

  • औरंगजेब
  • वेड्याचे घर उन्हात !

कथासंग्रह

  • हे हृदय कसे आईचे
  • लावण्यमयी

समीक्षाग्रंथ

  • कवी आणि कवित्व
  • नाटक : एक चिंतन

आत्मकथा

  • आत्मचिंतन
  • मी ... माझ्याशी (आठवणी)

एकांकिका

  • आनंदीबाई आणीबाणी पुकारतात
  • एकांकिकासंग्रह (तीन विनोदी एकांकिका). 'तीन एकांकिका' नावाची अाणखी दोन पुस्तके आहेत. लेखक - मो.ग. चव्हाण, दीपक कांबळी. त्यांशिवाय उमेशचंद्र बेलारे, द.मा. मिरासदार, विवेक गरुड, सी.म. चितळे यांचेही एकांकिकासंग्रह आहेत.
  • गड गेला पण सिंह जागा झाला
  • झेंडे पाटील महाविद्यालयात गंगू, अंबू, विठा
  • मद्रासीने केला मराठी भ्रतार
  • व्यासांचा कायाकल्प
  • शहाण्याला मार शब्दांचा
  • स्मगलर-सम्राटांच्या न्यायालयात रामशास्त्री

वसंतराव कानेटकर यांच्या वाङ्मयावरील समीक्षाग्रंथ

  • नाटककार - वसंत कानेटकर (चरित्र, शशिकांत श्रीखंडे)
  • मराठी नाटक आणि वसंत कानेटकर (डाॅ राजश्री कुलकर्णी-देशपांडे)
  • प्रा .वसंत कानेटकरांची ऐतिहासिक व पौराणिक नाटके (पंडितराव एस. पवार)
  • वसंत कानेटकरांची नाटके : वैविध्य आणि ध्रुवीकरण (रा. भा. पाटणकर)

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, ठाणे, इ.स. १९८८

वसंत कानेटकर यांच्या नावाने रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे वसंत कानेटकर स्मृति पुरस्कार दिला जातो.

पुरस्कार

  • इ.स. १९६६ साली सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार ( हिंदी चित्रपटः आँसू बन गये फूल, मूळ मराठी नाटकः अश्रूंची झाली फूले)
  • इ.स. १९९२मध्ये पद्मश्री पुरस्कार


  1. ^ "कानेटकर, वसंत – profiles" (इंग्रजी भाषेत). 2019-01-04 रोजी पाहिले.