वर्षा भोसले
वर्षा भोसले | |
---|---|
जन्म | वर्षा इ.स. १९५६ |
मृत्यू | ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ |
मृत्यूचे कारण | आत्महत्या |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | अण्णा |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | पत्रकार, गायिका |
धर्म | हिंदू |
आई | आशा भोसले |
वर्षा भोसले (इ.स. १९५६ - ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२) या मराठी गायिका, पत्रकार होत्या. या मराठी पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या कन्या होत्या.
कारकीर्द
वर्षा भोसले यांनी काही हिंदी, तसेच मराठी चित्रपटांतून पार्श्वगायन केले होते. रेडिफ या भारतीय वेबपोर्टलावर इ.स. १९९७-२००३ या काळात त्या लेखन करत. तसेच त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्लिश वृत्तपत्रातून काही काळ स्तंभ लिहिले [१].
मृत्यू
८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी वर्षा भोसले यांनी मुंबईतील आपल्या "प्रभुकुंज" या निवासस्थानी आत्महत्या केली. आपल्या परवानाप्राप्त रिव्हॉल्वरातून त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याचे निष्पन्न झाले [१].
संदर्भ व नोंदी
- ^ a b "आशाताईंच्या मुलीची गोळी झाडून आत्महत्या". ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)