Jump to content

वर्धन राजघराणे

वर्धन राजघराणे किंवा पुष्यभुती राजघराणे हे प्राचीन भारतातील एक साम्राज्य होते. इसवी सनाच्या ६व्या आणि ७व्या शतकात सम्राट हर्षवर्धन याने या साम्राज्याचा विस्तार केला. उत्तर भारतातील आपले साम्राज्य त्याने उत्तरेस आणि वायव्येस विस्तारले. पूर्वेकडे कामरूप आणि दक्षिणेकडे नर्मदा नदीपर्यंतचा प्रदेश सम्राट हर्षवर्धनाच्या अधिपत्याखाली होता. सध्या उत्तर प्रदेशात असलेली कनौज नगरी ही त्याची राजधानी होती. त्याची राजवट इ.स. ६४७ पर्यंत होती.