Jump to content

वरणफळे

वरणफळे

साहित्य

  1. कणिक
  2. हळद
  3. तिखट
  4. मिठ
  5. शेंगदाणा तेल
  6. तुरीची डाळ
  7. मोहरी
  8. चिंच
  9. गुळ/साखर(चवीसाठी)
  10. ओवा

पुर्व तयारी

प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या.कणकीत हळद,तिखट,मीठ,ओवा(थोडा)टाकुन घट्ट भिजवुन घ्या.त्याचे गोळे घेउन पणतीच्या आकाराच्या वाट्या (फळे)करून घ्या.आकार द्यायचा नसल्यास शंकरपाळ्यांच्या आकारात चौकोनी तुकडे करून तेही वरणात सोडून तळले जातात.

कृती

शिजविलेल्या तुरीच्या डाळीस फोडणी देउन फोडणीचे पातळ वरण तयार करावयास ठेवा.त्यात चविसाठी चिंच,गुळ/साखर टाका.

कृती १) यात आता तयार केलेली फळे टाका. चांगले शिजु द्या.

कृती २) कणकीचे गोळे घेउन त्याच्या जाडसर पोळ्या लाटा,शंकरपाळयाच्या आकारात कापा .फोडणीचे पातळ वरणात चांगले शिजु द्या.

सजावट

यास सजावट नाही.चिरलेली कोथिंबीर टाकुन खाण्यास द्या.

इतर माहिती

ह्या पदार्थाला खान्देशात दाळचिखल्या आणि सातारा,सांगली येथे चकुल्या असे देखील म्हणतात.पोळ्या लाटण्यापासुन सुटका म्हणुन हा पदार्थ     पर्याय आहे.