वन्यजीवन छायाचित्रण
वाइल्ड लाईफ फोटोग्राफी हा फोटोग्राफीचा असा प्रकार आहे की त्याचा संबंध जंगलातील वेगवेगळ्या प्राण्यांच्या नैसर्गिक सवई हेरून त्या समजुन फोटोग्राफी करता येते. हा फोटोग्राफी प्रकार अधिक आव्हानात्मक आहे तसेच ही फोटोग्राफी करताना मजबूत तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. म्हणजेच फोटोग्राफी करताना फोटोग्राफरला त्या प्राण्यांची पुढे काय हालचाल होणार आहे याचा बरोबर अंदाज असला पाहिजे आणि त्यासाठी फोटोग्राफी करणाराचे हस्त कौशल्य अतिशय छान असले पाहिजे म्हणजेच मजबूत पकड, लक्षाच्या हालचालीवर तीक्ष्ण नजर, सावध पवित्रा, याची गरज आहे. उदाहरणार्थ कांही प्राणी समोर येताना दबकतात किंवा कांही समोर येणे कठीण असते तेव्हा त्यांच्या सवयीचा अभ्यास असला पाहिजे तसेच त्यांच्या हालचालीचा अंदाज घेऊन पुढील कार्यवाही बाबत तत्पर निर्णय घेता आले पाहिजेत. प्राण्यांच्या पर्यन्त दबकत कसे जावे, वस्त्रे कोणती असावीत, काय लपवावे, कोठे लपावे या सर्व बाबींचा अभ्यास असला पाहिजे. कांही फोटोग्राफी संबंधाने विशेष आयुधे आवस्यक असतात. कीटकांची फोटोग्राफी करताना मायक्रो लेन्स,पक्ष्यांची फोटोग्राफी करताना दूर पल्याच्या लेन्स आणि पाण्यातील जीवानुंची फोटोग्राफी करताना पाण्यात वापरावयाचा कॅमेरा आवश्यक असतो.[१] योग्य ठिकाणी योग्य वेळेला पोहचुन फोटोग्राफी करणे हे चांगल्या फोटोग्राफीचे यश म्हणता येईल.
इतिहास
पूर्वी रानटी प्राण्यांची फोटोग्राफी करणे अतिशय अवघड होते त्याला कारण म्हणजे त्याबाबत असणारे अपुरे ज्ञान आणि जुन्या लेन्स.[२] सन 1906 मध्ये राष्ट्रीय भौगोलिक विभागाने जंगली प्राण्यांचे पहिल्यांदा फोटो प्रदर्शित केले.[३] हे फोटो U. S.चे पेन्न्सीलवानिया येथील प्रतिनिधि जॉर्ज शिरास III यांनी काढलेले होते. त्यातील कांही फोटो त्यांनी वायर जोडलेल्या कामेऱ्याने काढलेले होते.
परिभाषा
फोटोग्राफीक सोसायटी ऑफ अमेरीका, फेडरेशन आंतरराष्ट्रीय डी 1’ आर्ट फोटोग्राफीक आणि रायल फोटोग्राफीक सोसायटी या जगातील तीन उच्चतम्म फोटोग्राफीक संघटनांनी एकत्र येऊन निसर्गाची आणि जंगली प्राण्यांची फोटोग्राफी करण्यासाठी “वाइल्ड लाइफ फोटोग्राफी” ही परिभाषा ठरविली आणि त्यानुसार या संघटनेने एक लिखित निवेदन सादर केले ते म्हणजे सर्वांनी ठरविलेली फोटोग्राफीची परिभाषा म्हणजे “निसर्ग आणि वाइल्ड लाइफ फोटोग्राफी,” याचा फायदा सर्व फोटोग्राफरना होणार आहे.[४] ज्यांना आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांना फोटोग्राफीचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. याची माहिती तसेच फोटो संघटनेकडे गोळा होतील तेव्हा त्यांनाही त्याचा पुढील विकासासाठी व अडचनीतून मार्ग काढण्यासाठी उपयोग होईल.
संदर्भ
- ^ "नेशनल जिओग्राफिकच्या फोटोग्राफर ने प्रथमच डिजिटल कॅमेरा वापरले". 2016-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-02 रोजी पाहिले.
- ^ "चित्र पशु मंडळ".
- ^ "प्रथम राष्ट्रीय भौगोलिक वन्यजीव फोटो". 2016-05-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-02 रोजी पाहिले.
- ^ "निसर्ग आणि वन्यजीव फोटोग्राफी साठी सामान्य व्याख्या मान्य". 2014-05-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-02 रोजी पाहिले.