वनिता बोराडे
वनिता जगदेव बोराडे | |
---|---|
भारत सरकार द्वारा सर्वोच्च भारतीय महिला नागरी सम्मान 'नारी शक्ती-राष्ट्रपती पुरस्कार' प्रदान सोहळा, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली. | |
जन्म | २५ मे, १९७५ नायगाव देशमुख |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | सर्पमित्र |
प्रसिद्ध कामे | ५१,००० सापांना जीवनदान दिल्याच्या विश्वविक्रमाची नोंद |
मूळ गाव | बोथा |
ख्याती | जगातील प्रथम महिला सर्पमित्र, सर्पतज्ञ, सर्परक्षक म्हणून सुप्रसिद्ध. |
धर्म | हिंदू |
पुरस्कार | • छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, |
वनीता जगदेव बोराडे ह्या सोयरे वनचरे मल्टीप्रपोज फाउंडेशन संस्थे च्या संस्थापक अध्यक्ष असून वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात संरक्षण, संवर्धन व संशोधन करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला सर्पमित्र सर्पतज्ञ तथा सर्परक्षक व सरीसृप शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे. वन्यजीव समाजसेविका म्हणून त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था नासा ने त्यांना सदस्यत्व देऊन त्यांचा सचित्र कार्य वृत्तांत मिशन 2026 च्या मंगळ-यानामध्ये रेखांकित केले आहे. सोबतच यावर्षी Moon Mission चंद्रयानातही त्यांच्या या कार्याबद्दल सचित्र कार्य वृत्तांत छापण्यात आला असून बोर्डिंग पास व ॲप्रिसिएशन प्रमाणपत्रही ही नासा तर्फे त्यांना प्रदान करण्यात आले आहे.
वनिता जगदेव बोराडे ह्या जगातील प्रथम महिला सर्परक्षक, सर्पमित्र व सर्पतज्ञ आहेत. त्यांनी ५१००० पेक्षा जास्त सापांना लोक वस्तीतील संकटग्रस्त भागातून पकडून जंगलात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे सापांचा व लोकांचा जीव वाचला आहे. वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात त्या समाजसेविका म्हणून संरक्षण, संवर्धन व संशोधनासोबतच त्या शास्त्रीय वैज्ञानिक प्रबोधन कार्य करीत आहेत. भारत सरकार द्वारे त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या आधी भारतीय डाक विभागाने त्यांच्या सेवा कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. महाराष्ट्र शासना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण हेच प्राणसंजीवन हे ब्रीद घेऊन त्यांनी सोयरे वनचरे मल्टिपर्पज फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून विविध उपक्रम राबवित आहेत. जागतिक तापमान वाढ व प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्या कृतीशील जनजागरण मोहीम राबवत आहेत. जीव, जमीन, जल व जंगल यांची जैवविविधता साखळी संतुलित राखण्यासाठी त्या भारतात व भारताबाहेरही सोयरे वनचरे मल्टिपर्पज फाउंडेशन संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागरण कार्य करीत आहेत.
वन्यजीव व सर्प संरक्षण कार्य
वनिता बोराडे ह्यांचा जन्म श्री जगदेव उदैभान बोराडे ह्या शेतकरी कुटुंबात झाला. वयाच्या 10 व्या वर्षापासूनच आपल्या बाल मित्र मैत्रिणींच्या सोबत शेतात रानात जंगल व नदी मध्ये त्यांना निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची कला सहज काळात न काळात शिकता आली वडील जगदेव बोराडे हे धार्मिक व शाकाहारी होते. आपले आदिवासी बाल मित्र आणि मैत्रिणी नदी मधील खेकडे आणि मासे, झाडांवरील पक्षी तसेच मधमाश्यांच्या पोळ्यातील मध गोळा करतात तीक्ष्ण शास्त्रांनी झाडाच्या सालींना खरचटून त्यातील डिंक गोळा करतात इतकेच काय सुंदर हरीण, ससे, मोर, रोही, रान डुकरे यांना ही मारून खातात. फक्त पोटाची भूक भागविण्यासाठी आपले आदिवासी मित्र-मैत्रीण व त्यांचे कुटुंबियन प्राणी व वनसाप्ती यांचा जीव घेतात ह्या गोष्टीने वानिताच्या संवेदनशील बाल मनाला खूप दुख व्हायचे. अगदी लहान वयापासूनच त्यांना शुद्ध शाकाहारी जेवण उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या घरातील स्वयंपाक भाजी-भाकरी, चटणी-ठेचा-लोणचे, कधी-कधी सणासुधी प्रसंगी घरी बनविलेली पुरणपोळी व गोडधोड पदार्थ ही आपल्या बाल मित्रांमध्ये वाटप करायची. त्यांना आवडीचा खाऊ आणि खेळणी ही द्यायची हळू हळू त्यांची मांसाहाराची ओढ तिने वेग वेगळे उपक्रम राबवून तिने कमी केले. गावामध्ये बाल हरिपाठ मंडळ स्थापन करून बाल भजनी मंडळ सुरू केले वारकरी संप्रदायाची माळ त्यांच्या गळ्यात घालून त्यांना शाकाहारी बनविले. नदीमध्ये जाळे लावून पकडलेले मासे या मित्रांकडून परत घेऊन वनिता नदीमध्ये सोडून द्यायची, या जाळ्यामध्ये अडकलेले साप हे पाण साप असून त्यांनी चावा घेतला तर काहीही होत नाही असा आदिवासी लोकांचा गैरसमज असल्याने हे सापही ते पाण्यात सोडून द्यायचे त्यांचे हे पाहून पाहून वनिताही सापांना मास्यांच्या जाळ्यातून मोकळे करून हाती घेऊन जिवंत सोडून द्यायला शिकली व इथेच तिच्या सर्प संरक्षण कार्याचा शुभारंभ झाला. आदिवासी लोकांनी पकडलेले जंगली प्राणी, हरीण, मोर, ससे, त्यांना अन्न,वस्तू, खेळणी, प्रसंगी पैसे देऊन हे प्राणी परत घ्यायचे व जंगलात सोडून द्यायचे व अश्याप्रकारे वन्यजीव व सर्प संरक्षण कार्य वानितांने बाल वयातच सुरू केले. हे आजरोजी लहानपणी छंद म्हणून जोपासलेले काम वनिताने वयाच्या विविध टप्प्यावर अविरतपणे सुरू ठेवले.जगातील सर्वात जास्त विषारी आणि बिनविषारी साप पकडून जिवंत जंगलात सोडून सापांचा आणि लोकांचा प्राण वाचवून ५१००० पेक्षा जास्त सापांना वाचवून जीवदान देत विश्वविक्रम प्रस्थापित केला म्हणूनच वनिता आज जगातील पहिली महिला सर्परक्षक म्हणून ओळखली जाते. वर्ल्ड किंग- वर्ल्ड रेकॉर्ड युनियन ने वनिताला प्रमाणपत्र देऊन टोप १०० वर्ल्ड किंग २०२३ म्हणून होशीत केले या कामगिरीचा सन्मानपूर्वक समावेश वर्ल्ड किंग वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये करणात आला आहे.[१]
पुरस्कार
- आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे
- भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री पुरस्कार 2021 साठी नामांकन प्राप्त.
- युनायटेड नेशनन्स विश्वशांती परिषदेच्या सदस्य.
- वर्ल्ड कॉस्टुटिशन अँड पारल्मेंट असोशियन यु.नो. अमेरीका यांच्याकडून आजीव सदस्यत्व.
- गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकार्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून यांच्याकडून ५१,००० सापांना जीवदान देण्याच्या विश्वविक्रमाची अधिकृत नोंद.[२]
- भारतीय डाक विभागाकडून सन्मानार्थ टपाल टिकीट जारी. [३]
- सामाजिक वनीकरण,वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान.
- आजीव सदस्य पिपल फॉर अॅनीमल, नवी दिल्ली.
- जगातील पहिल्या महिला सर्परक्षक, सर्पतज्ञ, सर्ममित्र म्हणून घोषित. [४]
- संस्थापक अध्यक्ष सोयरे वनचरे मल्टिपर्पज फाऊंडेशन बोथा.
- आजीव सदस्य महा एन्जीओ फेडेशन पुणे.
- आजीव सभासद / महिला राज्य सचिव आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य.
- जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.
- राष्ट्रीय सेवा सम्मान 2021:- महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी (महाराष्ट्र राज्य) यांनी जागतिक महिला दिनाच्या अवचित्यावर वने,वन्यजीव,निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या सेवाभावी कार्याच्या सन्मानार्थ राजभवन मुंबई येथे "राष्ट्रीय सेवा सम्मान पुरस्कार" देऊन महाराष्ट्र शासनाकडुन शासकीय सत्कार केला.[५]
- नारी शक्ती पुरस्कार [६]
संदर्भ
- ^ "Home - Worldkings - World Records Union". worldkings.org. 2024-07-15 रोजी पाहिले.
- ^ "FIRST WOMAN SNAKE RESCUER" (इंग्रजी भाषेत). 2021-02-02 रोजी पाहिले.
- ^ प्रतिनिधी, सामना. "सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या सन्मानार्थ डाक विभागाने जारी केले टपाल तिकीट". 2020-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-04 रोजी पाहिले.
- ^ मित्रा, ऋचा. "51 हजार सांपों से है इस महिला की दोस्ती, करती है इनके साथ सैर" (हिंदी भाषेत).
- ^ "सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रीय सेवा सम्मान पुरस्कार". 2021-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रपति ने सांप को रेसक्यू करने वाली देश की पहली महिला बचावकर्ता वनिता जगदेव को दिया नारी शक्ति सम्मान". oneindia.com. ९ मार्च २०२२ रोजी पाहिले.
साचा:Child