वनस्पतींचे नामकरण
वनस्पतींच्या नामकरणाची भारतीय पद्धत
कोणत्याही एखाद्या खास वस्तूचे इतरांपासून वेगळेपणा जपण्यासाठी व ओळखण्यासाठी तिचे 'नामकरण' केले जाते. जुन्या भारतीय विद्वानांनी वनस्पतींचे नामकरण याच विचाराने केले होते.
प्राचीन पद्धत
भारतास इतर देशांप्रमाणेच किंबहुना, थोड्याशा जास्तच प्रमाणात प्राचीन परंपरा आहेत. पूर्वी संस्कृत भाषा प्रचलनात होती. त्यानंतर अनेक भारतीय भाषांचा जन्म झाला. मराठीही अशीच एक भाषा. त्यामुळे सध्या मराठीत प्रचलित असलेली वनस्पतींची बहुतेक नावे संस्कृतवरूनच आलेली आहेत.
मात्र वनस्पतींच्या काही नावांवर स्थानिक प्रभाव असल्याचे दिसून येते.. त्या विशिष्ट प्रदेशांत उगवणाऱ्या वनस्पती जेव्हा महाराष्ट्रात आल्या, किंवा महाराष्ट्राला माहीत झाल्या, तेव्हा त्यांचे त्या प्रदेशातले मूळ नाव किरकोळ बदल होऊन मराठीत आले.
काल लिनियस या शास्त्रज्ञाने द्विनाम पद्धतीचा वापर जगात सर्वप्रथम सुरू केला . या संशोधकाच्या कार्यामुळे आज अनेक सजीवांना शास्त्रीय नाव प्राप्त झाले आहे ही नावाची पद्धत संपूर्ण जगामध्येे वापरली जाते. या पद्धतीमुळे भाषेतील फरकामुळे होणारे गोंधळ ,हे टाळता येतात वैज्ञानिक. सध्याचे दिनांक वैज्ञानिक जग पूर्णपणे द्विनाम पद्धतीचा वापर करत आहे.याया या
जसे :
- अगरू=मूळचे दाक्षिणात्य नाव, मलबार प्रांतात उगवण
- फणस= मूळ कोकण, गोव्याकडले
काही नावांना, ज्या देशांमधून ती वनस्पती आली त्या देशाचे नाव जोडण्यात आले आहे.
काही वनस्पतींना ज्या देशांमधून ती आली, त्या देशात तिचे असलेले नांव तसेच ठेवण्यात आले आहे.
वनस्पती सहजगत्या ओळखण्यात यावी म्हणून सर्वसामान्यास पटकन आकलन होईल अशी त्या वनस्पतीच्या दर्शनानुसार नावे उदाहरण :
- अबोली :अबोली रंगाचे फूल येणारी वनस्पती
- कढीलिंब : कढी या खाद्यपदार्थात टाकतो ती पाने
- गुलबक्षी : गुलबक्षी रंगाची फुले असणारी वनस्पती
- गोकर्णी :गाईच्या कानासमान, या वनस्पतीची फुले गाईच्या कानाच्या आकाराची असतात.
- शिवलिंगी :शिवाच्या लिंगाप्रमाणे या वनस्पतीच्या बिया असतात.
- गोजिव्हा :या वनस्पतीची पाने गाईच्या जिभेसारखी खरखरीत असतात.
- उंदिरकानी :उंदराच्या कानाप्रमाणे असलेली.
- काकजंघा :कावळ्याच्या पायाप्रमाणे शाखांची संधी असलेली.
- कांडवेल :या वेलीचे खोड हे कांडाच्या कांडांपासून(तुकड्यांपासून) बनलेले असते
- जटामांसी :मुळास जटेप्रमाणे केस असणारी
- शतावरी : शत=शंभर. यास जमिनीत अनेक कंद असतात
- हाडमोडी : हाड मोडल्यावर ज्याचा पाला लावायचा ती
- रानभेंडी : रानात उगवणारे भेंडीच्या झाडासारखे दिसणारे एक झाड
- मयूरशिख :मोराच्या शेंडीप्रमाणे तुरे असणारे
- मखमल : ज्याची फुले मखमलीप्रमाणे दिसतात
- करंज : करंजीच्या आकाराची फळे असणारे.
- जांभूळ : जांभळ्या रंगाची फळे असणारे झाड.
चवीनुसार नावे
गुणांनुसार नावे
- गुग्गुळ :गुळगुळीत असणारा=गुळगुळ(अपभ्रंश-गुग्गुळ)
- दुधी भोपळा :चिरल्यावर आतून दुधाच्या रंगाप्रमाणे दिसणारा.
- निर्मळी : ज्याच्या बिया पाण्यात टाकल्यावर गढूळ पाणी बरेच स्वच्छ होते, ती.
- अमरवेल - नुसता तुकडा तोडून एखाद्या दुसऱ्या वनस्पतीवर टाकल्यास, याची आपसूकच वाढ होते, ती मरत नाही म्हणून अमर व वेलवर्गीय आहे म्हणून वेल
वापरानुसार नावे
- गवती चहा :चहामध्ये टाकावयाची, गवतासारखी पाने असणारी वनस्पती
इतर देशांमधील प्राचीन नामकरण पद्धत
लिबेलस दि मेडिसिनालिबस इंदोरम हेर्बिस (मूळ लॅटिन शब्द. अर्थ: इंडियनांचे वैद्यकीय वनस्पतींवरचे छोटे पुस्तक) हा ग्रंथ म्हणजे वनस्पतिविषयक हस्तलिखित असून, त्यात अझ्टेकांकडून विविध वैद्यकीय गुणधर्म असलेल्या ज्या वनस्पती वापरल्या जातात, त्यांची माहिती दिलेली आहे. याचे भाषांतर १५५२मध्ये मार्तिन दिला क्रुझ ह्याने ट्लाटेलोल्कोमध्ये नाहुआट्ल भाषेत केले. (ही प्रत खूप काळ टिकली नाही). नंतर जुआन बादियानोने मूळ नाहुआट्लमधून लॅटिनमध्ये भाषांतरित केले. लिबेलस हा ग्रंथ बादियानोने अनुवादित केल्यानंतर बादियानस मॅन्युस्क्रिप्ट ह्या नावानेही ओळखला जाई. नंतर तो ग्रंथ मूळ लेखक आणि अनुवादक ह्याच्या नावाने - कोडेक्स दिला क्रुझ-बादियानो - ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. यानंतर १७व्या शतकातील हस्तलिखितांचा संग्रह ज्या कार्डिनल फ्रान्सिस्को बर्बेरिनीकडे होता, तो त्याच्याच नावाने म्हणजे, कोडेक्स बर्बेरिनी म्हणूनही ओळखला जाऊ लागला. मुळातल्या भारतीय ग्रंथाची ही स्थानांतरे, स्थित्यंतरे आणि नामकरणे मजेदार आहेत.
वनस्पतीशास्त्रीय नामकरणाची आधुनिक पद्धत
वनस्पतींच्या शास्त्रीय नामकरणासाठी काही नियम हवेत हे एकोणिसाव्या शतकात कळून चुकले. त्यानुसार, कायद्याचा एक ढाचा तयार करण्यात आला. उत्तरोत्तर याच ढाच्याची अधिकाधिक चांगली संस्करणे प्रकाशित होत गेली. वनस्पतींसाठी, प्रकाशनात सुधारणा होण्याच्या सन १८६७, १९०६, १९५२ ह्या प्रमुख तारखा आहेत. त्या वर्षी, अनुक्रमे लुईस-डी-कॅन्डोले,(lois de Candolle), ’व्हिएन्ना नियम’ नावाचे वनस्पतीशास्त्रीय नामकरणासाठी आंतराष्ट्रीय नियम (International Rules of Botanical Nomenclature, 'Vienna Rules') आणि त्याचसाठीचे ’स्टॉकहोम कोड’ नावाचे आंतरराष्ट्रीय संकेत स्थापित केले गेले.. (International Code of Botanical Nomenclature, 'Stockholm Code').
हे सुद्धा पहा
- वनस्पतींची यादी
- ऍझटेक प्राचीन ग्रंथ
- en:Wikipedia:Flora naming conventions फुलोऱ्यास नामाभिधानाचे ठोकताळे
- en:Wikipedia:Botanical nominclature वनस्पतीशास्त्रिय नामकरण
- en:Wikipedia:Nomenclature Codes नामकरणाचे संकेत
- en:Wikipedia:International Code of Botanical Nomenclature
- en:Wikipedia:International Code of Nomenclature for Cultivated Plants
- en:Wikipedia:Systematic name पद्धतशीर नावे