वनवासमाची
हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. वनवासमाचीचे मुख्य दोन भाग पडतात जुने गावठाण व नवे गावठाण. गावामध्ये सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असून त्यापुढील शिक्षणासाठी वहागांव अथवा कराडला जावे लागते.
सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या कुशीत वसलेल्या या गावाला ऐतिहासिक वारसा आहे.गावच्या दक्षिणेस टेकडीवरती पांडवकालीन दगडी शिलांमध्ये बांधलेले शिवमंदिर आहे.या मंदिरास धर्मराज मंदिर असेही संबोधले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिरात मोठा सोहळा पार पडतो.
गावाच्या मध्यभभागी विठ्ठल रुक्मिणीचे व पश्चिमेस डोंगराच्या पायथ्यास मारुतीचे मंदिर आहे. वैशाख अमावास्येला ग्रामदैवत मारुतीची मोठी यात्रा भरते.
गावच्या दक्षिणेकडील डोंगरकड्यात शिवाजीच्या काळातील एक टेहळणी गुहा आहे.