Jump to content

वनपर्ति (तेलंगणा)

  ?वनपर्ति
वनपर्ति
तेलुगू : వనపర్తి
तेलंगणा • भारत
—  शहर  —
वाणपर्तिच्या राजाचा राजवाडा
वाणपर्तिच्या राजाचा राजवाडा
वाणपर्तिच्या राजाचा राजवाडा
Map

१६° २१′ ३९.६″ N, ७८° ०३′ ४५.७२″ E

वनपर्ति is located in तेलंगणा
वनपर्ति
वनपर्ति
वनपर्तिचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 16°21′39.6″N 78°3′45.72″E / 16.361000°N 78.0627000°E / 16.361000; 78.0627000

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२७.४० चौ. किमी
• ३६५ मी
हवामान
वर्षाव

• ६३८.६ मिमी (२५.१४ इंच)
प्रांततेलंगणा
जिल्हावनपर्ति जिल्हा
लोकसंख्या
घनता
६०,९४९
• २,२२४/किमी
भाषातेलुगू
संसदीय मतदारसंघनागरकर्नूल
विधानसभा मतदारसंघवनपर्ति
स्थानिक प्रशासकीय संस्थावनपर्ति नगरपालिका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• 509103
• +०८५४३
• TS-32[]
संकेतस्थळ: वनपर्ति नगरपालिका

वनपर्ति (Wanaparthy) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वनपर्ति जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे राज्य राजधानी हैदराबादपासून १४९ किमी अंतरावर आहे. वनपर्तिच्या राजाचे महल हे शहरातील प्रमुख आकर्षण आहे.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १२,८६६ कुटुंबांसह ६०,९४९ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३१,५०१ पुरुष आणि २९,४४८ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९३५ स्त्रिया. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ६१२२ आहे जी कामारेड्डीच्या एकूण लोकसंख्येच्या १०.०४% आहे.सरासरी साक्षरता दर ७७.९१% होता.

८३.००% लोक हिंदू आणि (१५.३७%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.०५%), शीख (०.०२%), बौद्ध (०.०३%), जैन (०.०१%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.५२%) यांचा समावेश होतो.[][]

तेलुगू वनपर्तिमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.[]

भुगोल

वनपर्ति हे उत्तर अक्षांशाच्या १६°२१′३९.६″N आणि पूर्व रेखांशाच्या ७८°०३′४५.७२″E वर स्थित आहे. वनपर्तिची सरासरी उंची ३६५ मीटर आहे.[] वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६३८.६ मिलिमीटर (२५.१४ इंच) आहे.[] हे शहर कृष्णा नदीच्या खोऱ्यात आहे.

प्रशासन

वनपर्ति नगरपालिकेची स्थापना ही १९८४ मध्ये करण्यात आली, शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र २७.४० किमी (१०.५७ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ३६ प्रभाग आहेत.[] वनपर्ति हे शहर वनपर्ति विधानसभा मतदारसंघात येते. जो नागरकर्नूल लोकसभा मतदारसंघात मोडतो.

वनपर्ति संस्‍थान

वनपर्ति संस्‍थान किंवा वनपर्तिचा राजा हा हैदराबादच्‍या निजामाचा जामिनदार होता. वनपर्तिच्या सरंजामशाहीवर त्यांनी नियंत्रण ठेवले.

वाहतूक

वनपर्ति येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. वनपर्ति हे शहर राष्ट्रीय महामार्ग ४४ या महामार्गाद्वारे सुगम आहे.

जवळचे रेल्वे स्थानक हे वनपर्ति रोड रेल्वे स्थानक आहे.

शिक्षण

तेलंगणातील पहिले तंत्रनिकेतन महाविद्यालय (पॉलिटेक्निक कॉलेज) कृष्ण देव राव शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय (के.डी.आर. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) वनपर्थी येथे सुरू झाले.[]

हे देखाल पहा

संदर्भ

  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ "Wanaparthy Municipality City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-10 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2016-06-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-02-10 रोजी पाहिले.
  4. ^ "Population By Mother Tongue - Town Level".
  5. ^ "Wanaparthy topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-10 रोजी पाहिले.
  6. ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-10 रोजी पाहिले.
  7. ^ "Welcome to K.D.R.Government Polytechnic, Wanaparthy". polytechnicts.cgg.gov.in. 2022-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-10 रोजी पाहिले.