Jump to content

वनकी (पक्षी)

इंग्रजी नाव

Cotton teal

मराठी नाव

वंडकी,वनकी,फंडकी,गजरे,अडी,काणूक

हिंदी नाव

गिरीजा,गुडगुडा,गंगरैल

वनकी हा आकाराने तित्तिराएवढा असतो.त्याच्या पिसाऱ्यात ठळक पांढरा रंग असतो व चोच आखूड असतो. त्याची चोच दिसायला हंसाच्या चोचीसारखी असते.नराच्या वरचा रंग उदी असतो.गळ्याला काळी कंठी असते.पंखाची किनार पांढरी असते.मादीला कंठी व किनार नाही.विनिनंतरच्या हंगामात नर दिसायला मादीसारखा लागतो.यातील फरक पंखावरच्या पांढऱ्या काठाने कळून येतो.वनकी हा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.तो सर्वात जास्त पाणी असलेल्या प्रदेशात आढळतो.त्यामुळे जवळजवळ सर्व भारतभर आणि श्रीलंकेत दिसून येतात.विनकी झिलानी आणि तळी या भागात आढळतो.

Cotton pygmy goose Prasanna Mamidala

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली