वणी विधानसभा मतदारसंघ
वणी विधानसभा मतदारसंघ - ७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वणी मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. मारेगांव, २. झरी जामणी आणि ३. वणी या तालुक्यांचा समावेश होतो. वणी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे संजिवरेड्डी बापुराव बोदकुरवार हे वणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | वामनराव बापूराव कासावार | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
वणी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
वामनराव बापुराव कासावार | काँग्रेस | ५५,६६६ |
विश्वास रामचंद्र नांदेकर | शिवसेना | ४५,२२६ |
संजय नीळकंठराव डेरकर | अपक्ष | ४१,३३० |
राजू उंबरकर | मनसे | ११,३२० |
दिलीप नारायण | बसपा | ६,२२५ |
अनिल नत्थूजी घाटे | भाकप | ६,०४२ |
बेबीताई बैस-पाटील | अपक्ष | १,९८३ |
नीळकंठ बरबाजी जुमडे | अपक्ष | १,६२८ |
पुंडलिक श्रवण साठे | भाबम | १,२६१ |
नारायण शाहू गोडे | अपक्ष | १,१७० |
जावेद कुरेशी तथा प्रा. जावेद पाशा | अपक्ष | १,१०६ |
संतोष एकनाथ बरडे | शिपा | ५५० |
बंडू बंसी सिदाम | गोंगपा | ४२७ |
आबिद हुसेन जहीद हुसेन | अपक्ष | ३५५ |
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वणी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".