वणवा एक क्रांती
वणवा एक क्रांती
हे एक मराठी नाटक आहे.
- लेखक आहेत गणेश शिंदे.
- नाटकाचे दिग्दर्शन आनंद बुरड यांनी केले आहे
- नाटकाचे संगीत सुरेश गायकवाड यांचे आहे.
- या नाटकातील कलाकरांनीच नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा केल्या आहेत.
नाटकाचे स्वरूप :
लोकांपुढे काही समस्या मांडणे आणि त्यांची सोडवणूक करयासाठी लोकांना प्रेरित करणे हा या सामाजिक नाटकाचा हेतू आहे. या नाटकात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांची व्यथा मांडण्यात आली आहे. नावाप्रमाणेच नाटकातील एका पात्राच्या मनात अन्यायाविरुद्ध वणवा पेटतो आणि एक क्रांती घडते. समाजात जात-पात, उच्च-नीचता यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडवून सलोख्याने राहण्याचा सल्ला या नाटकाद्वारे देण्यात आला आहे.
नाटकात एकूण ४ गाणी आहेत.
नाटकाचे सादरीकरण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे.
कलाकार :
- गणेश शिंदे
- भाग्यश्री नगरकर
- चिन्मयी स्वामी
- आनंद बुरड
- सुश्रुत मुळावेकर
- योगेश तवार
- सुरेश गायकवाड
- रोहन दिघे
- अदित्य ढेंबरे
- मोहित कुंटे
- सुयश शेठ
- प्रकाश योजना - सर्वेश मेह्ंदळे
- रंगभूषा - बाळ जुवाटकर
- नृत्य दिग्दर्शन - चिन्मयी स्वामी
- ध्वनिसंयोजन - प्रवीण शिंदे
नाटकाचा कालावधी :
दोन अंकी नाटक (१तास ५०मिनिटे)
दीर्घांक (१तास २०मिनिटे),
एकांकिका (४५मिनिटे).
शुभारंभाचा प्रयोग
या नाटकाचा पहिला प्रयोग "४ जानेवारी २०१५" रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत, पुण्याजवळच्या पिंपरी शहरातील संत तुकाराम नगर तेथील आचार्य अत्रे सभागृहात, प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत झाला.