वडाळा विधानसभा मतदारसंघ
वडाळा विधानसभा मतदारसंघ - १८० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वडाळा मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ६३० नायगांव, जनगणना वॉर्ड क्र. ७३१ माटुंगा, जनगणना वॉर्ड क्र.६२९ शिवडी मधील इन्युमरेशन ब्लॉक ३२ ते ४८, ३०४ ते ३०६, ३०९ ते ३१०, जनगणना वॉर्ड क्र. ७३२ सायन मधील इन्युमरेशन ब्लॉक ५७, ७५, ११३ ते ११५, १७९ ते १८३, ३६० ते ३६७, ३९४, ४१० ते ४१३, ४५० ते ४७४, ४८०, ४८१, ४९० ते ४९५, ५४१ ते ५५१, ५७१, ६०५ ते ६१५, ६४४ ते ७९०, ७९५ आणि ७९६, जनगणना वॉर्ड क्र. ९३५ प्रभादेवी मधील इन्युमरेशन ब्लॉक १२२ ते १३०, १३२, १३४ ते १६२ यांचा समावेश होतो. वडाळा हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे कालिदास नीळकंठ कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | कालिदास नीळकंठ कोळंबकर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | कालिदास नीळकंठ कोळंबकर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | कालिदास नीळकंठ कोळंबकर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वडाळा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
कालिदास निलकांत कोळंबकर | काँग्रेस | ५५,७९५ |
दिगंबर दत्ताराम कांदरकर | शिवसेना | २५,७६५ |
प्रमोद शिवाजी पाटील | मनसे | २४,०२२ |
सचिनभाई दयानंद मोहिते | रिपाई (आ) | ३,२७२ |
सिल्विन योहान काळे | बसपा | १,३६२ |
अरविंद गणपत पवार | भाबम | ६६० |
बबन गणपत जाधव | अपक्ष | ६०९ |
रोहन गौरू तांबे | शिपा | २९२ |
खान अहमदुल्ला सखावत अली | अपक्ष | २५६ |
खान रझा हुसेन मोहम्मद इस्लाम | अपक्ष | २३७ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".