वडाप
वडाप ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात वाहतुकीसंदर्भात वापरली जाणारी एक संज्ञा आहे.याचा निर्देश वेगवेगळ्या प्रकारच्या अनधिकृत वाहतूकींकडे असतो.
ग्रामीण भागात एखाद्या खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी किंवा अन्य एखाद्या मोठ्या / महत्त्वाच्या गावात जाण्यासाठी जीप सारख्या चार चाकी वाहनांचा वापर केला जातो.
त्या वाहनास वडाप असे म्हणतात.
वडाप या नावाच्या उत्पत्तीची आख्यायिका
१) या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वाहनामधे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. म्हणजेच ते वाहन अधिकाधिक प्रवासी ओढून घेते किंवा प्रवासी वडते ... म्हणून त्यास वडाप असे नाव पडले असे म्हणतात.
२) बऱ्याच गावांच्या गावठाणामधे (शक्यतो मंदिराजवळ किंवा चावडीजवळ) एक सामायिक मोकळी जागा असते; ज्याठिकाणी बऱ्याचदा एक वडाचे झाड असते. या वडाच्या झाडाखाली जीपगाड्या प्रवाश्यांची प्रतिक्षा करत थांबतात.... म्हणून त्यास वडाप असे नाव पडले असे म्हणतात.
हे सुद्धा पहा
- काळीपिवळी