वज्रबोधी
वज्रबोधी (Ch.金剛智) ( ६७१ - निर्वाण: ७४१) हे भारतीय बौद्ध भिक्खु होते. मूळचे केरळ येथील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले वज्रबोधी हे इ.स. ७१९ साली चीनला पोहोचले. व तीथे त्यांनी चार पुस्तकांचे भाषांतर केले. त्यांनी नालंदा विद्यापीठत वयाच्या दहाव्या वर्षीच प्रवेश मिळवला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. शाओलिन मठात यांनीच चिनी मार्शल आर्ट्सचा पाया घातला असे मानले जाते. हे योगसामर्थ्याने त्यांचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असत असा प्रवाद आहे. वयाच्या ७१व्या वर्षी वज्रबोधींचे चीनमधे निर्वाण झाले.