Jump to content

ल्होत्से

ल्होत्से (नेपाळी: ल्होत्से, चिनी: 洛子峰) हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून ८,५१६ मी (२७,९४० फूट) आहे. जवळची शिखरे अनुक्रमे ल्होत्से मध्य(पूर्व) ८,४१४ मी (२७,६०५ फूट) व ल्होत्से शार ८,३८३ मी (२७,५०३ फूट) उंच आहेत. ल्होत्से पर्वत तिबेट व नेपाळचा खुम्बू भाग यांच्या सीमेवर आहे.

या ‘साउथ कोल’ची उंची देखील ८ हजार मीटरहून अधिक आहे. १९५६ साली फ्रित्झ लुिशगर व अर्न्‍स्ट रीस या स्विस गिर्यारोहकांनी या शिखरावर सर्वात पहिली यशस्वी मोहीम केली. २०१३ साली ‘गिरिप्रेमी’च्या संघाने ‘माउंट एव्हरेस्ट-माउंट ल्होत्से’ या दुहेरी मोहिमेअंतर्गत हे शिखर सर केले.