Jump to content

लोकसभा

प्रकार
प्रकार कनिष्ठ सभागृह
इतिहास
नेते
अध्यक्षओम बिर्ला, भारतीय जनता पार्टी
जून १९, इ.स. २०१९
उपसभापती रिक्त,
बहुमत नेतानरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी
मे २६, इ.स. २०१४
विरोधी पक्षनेता रिक्त,
संरचना
सदस्य ५५२ (५५० निर्वाचित + २ नियुक्त)
राजकीय गटभारतीय काँग्रेस प्रणित संपुआ
राजकीय गटडावी आघाडी
भाजप प्रणित रालोआ
निवडणूक
मागील निवडणूक२०१९ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक
मागील निवडणूक२०१४ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली
संकेतस्थळ
लोकसभेचे संकेतस्थळ
तळटिपा
धर्मचक्रपरिवर्तनाय

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात). पण 104 व्या घटनादुरुस्ती नंतर ही दोन पदे रद्द होणार.

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.लोक सभा ही प्रथम सभागृह म्हणतात.

राज्यागणिक मतदारसंघ

घटक राज्यप्रकारमतदारसंघ
अरुणाचल प्रदेशराज्य
आंध्र प्रदेशराज्य२५
आसामराज्य१४
उत्तर प्रदेशराज्य८०
उत्तराखंडराज्य
ओडिशाराज्य२१
कर्नाटकराज्य२८
केरळराज्य२०
गुजरातराज्य२६
गोवाराज्य
छत्तीसगढराज्य११
झारखंडराज्य१४
तमिळनाडूराज्य३९
तेलंगणाराज्य१७
त्रिपुराराज्य
नागालँडराज्य
पंजाबराज्य१३
पश्चिम बंगालराज्य४२
बिहारराज्य४०
मणिपूरराज्य
मध्य प्रदेशराज्य२९
महाराष्ट्रराज्य४८
मिझोरमराज्य
मेघालयराज्य
राजस्थानराज्य२५
सिक्कीमराज्य
हरियाणाराज्य१०
हिमाचल प्रदेशराज्य
जम्मू आणि काश्मीरकेंद्रशासित प्रदेश
अंदमान आणि निकोबारकेंद्रशासित प्रदेश
चंदीगढकेंद्रशासित प्रदेश
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीवकेंद्रशासित प्रदेश
लडाखकेंद्रशासित प्रदेश
दिल्लीकेंद्रशासित प्रदेश
पुदुच्चेरीकेंद्रशासित प्रदेश
लक्षद्वीपकेंद्रशासित प्रदेश

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे