लोकशाही समाजवादाची वाटचाल
भारतात लोकशाही समाजवादचा विचार १९३० नंतर मांडला जाऊ लागला . १९३४ साली कोंग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीला मार्क्सप्रणीत साम्यवादाचा विचार त्यांनी बव्हंशी प्रमाण मानला. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीपासून अलिप्त न राहता त्यात सर्व शक्तिनिशी उतरले पाहिजे व त्या चळवळीला समाजवादी वळण देण्याचा प्रयत्नं करीत राहिले पाहिजे असे त्यांनी मानले. साम्यवादी राजवटीतिल व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकोच त्यांना आक्षेपाह॔ वाटला तसेच शेतीप्रधान असलेल्या या देशात कामगारवर्ग हाच क्रांतीचा अग्रदूत बनेल असे मानल्याणे आपलीच दिशाभूल होते असे त्यांनी मानले. येथील सामाजिक व धार्मिक व्यवस्थेतिल विषमतेकडेही त्यांनी लक्ष वेधले .
राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा चालू असताना कोंग्रेस ही एक राष्ट्रीय आघाडी समजून समाजवादी कोंग्रेसमध्ये राहिले . १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र्यं झाला. स्वातंत्र्यानंतर कोंग्रेसच्या नेत्यांनी कोंग्रेसअंतर्गत उपपक्षाच्या अस्तित्वावर गदा आणणारे फरक कोंग्रेसच्या घटनेत केले. अशा परिस्थितीत कोंग्रेस हे समाजवादाच्या निर्मितीचे साधन बनू शकणार नाही, अशी खात्री पटल्यामुळे १९४८ मध्ये नाशिक येथील सहाव्या अधिवेशनात सोशालिस्ट पक्षाने कोंग्रेसचा त्याग केला. १९४९ मधील पाटणा येथील ७ व्या अधिवेशनात शांततामय लोकशाही मार्गानेच समाजवादाच्या निर्मितीचा निर्धार जाहीर करण्यात आला.
१९५२ मध्ये भारतात पहिली साव॔ञिक निवडणूक झाली . समाजवादी पक्षातर्फे तयार केलेल्या जाहीरनाम्यात पक्ष अधिकाररूढ झाल्यास देशातील विविध समस्या सोडविण्यासाठी पहील्या पाच वषा॔त कोणता काय॔क्रम अमलात आणील याची निश्चित योजना मांडण्यात आली होती पण या निवडणुकीत समाजवादी पक्षास अपयश आले . १९५२ च्या मध्ये पक्षाची खास परिषद पंचमढी येथे भरली . निराश झालेल्या पक्ष सभासदामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काय॔ या अधिवेशनाने केले.
.