लोकराज्य
लोकराज्य महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केले जाणारे मासिक आहे. हे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आहे. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक आहे.[१] लोकराज्य हे मराठी मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून ऑडिट ब्युरो ऑफ सक्युर्लेशन (अेबीसी)ने अधिकृत मोहोर उमटवली आहे.[२] याच्या मुद्रक व प्रकाशन मीनल जोगळेकर आहेत तर संपादक ब्रिजेश सिंह आहेत.
महाराष्ट्र शासनामार्फत विविध विषयावर होत असलेली कामे, महत्त्वपूर्ण घडामोडी, मंत्रिमंडळ निर्णय, सरकारची धोरणे, कला, संस्कृती, भाषा, विविध क्षेत्रांतील माहिती इत्यादी विषयांचे लोकराज्याचे विशेषांक निघतात. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती व उर्दू अशा पाच भाषेत हे मासिक प्रसिद्ध होते. या मासिकाची इंग्रजी आवृत्ती महाराष्ट्र अहेड या नावाने प्रसिद्ध होते.[३] हे मासिक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध असते. संकेतस्थळावर इ.स. १९४७ सालापासूनचे अंक ऑनलाइन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत.[४]
संदर्भ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2018-09-01 at the Wayback Machine.
- क्रमवारीमध्ये लोकराज्य Archived 2014-09-20 at the Wayback Machine.