Jump to content

लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेस

लोकमान्य टिळक टर्मिनस−कोइंबतूर एक्सप्रेसचा फलक

११०१३/११०१४ लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस (प्रचलित नाव: कुर्ला एक्सप्रेस) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोइंबतूर ह्या स्थानकांदरम्यान धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी मुंबई ते कोइंबतूरदरम्यानचे १५१३ किमी अंतर ३२ तास व २५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.

वेळापत्रक

  • ११०१३ लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस मुंबईहून रात्री २२:३५ वाजता निघते व कोइंबतूरला तिसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता पोचते.
  • ११०१४ कोइंबतूर − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कोइंबतूरहून सकाळी ०८:४५ वाजता निघते व मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी १४:३० वाजता पोचते.

थांबे

बाह्य दुवे