Jump to content

लोकमत


लोकमत
प्रकारदैनिक वृत्तपत्र
आकारमान७४९ बाय ५९७ मीमी

मालकजवाहरलाल दर्डा
प्रकाशकलोकमत मीडिया लिमिटेड
संपादकचक्रधर दळवी
मुख्य संपादकसुधीर महाजन
स्थापना९ जानेवारी इ:स १९८१
भाषामराठी
किंमत५₹
मुख्यालयनागपूर
भगिनी वृत्तपत्रेलोकमत समाचार, लोकमत टाइम्स

संकेतस्थळ: http://lokmat.com/


लोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. मुख्यालय - नागपूर, महाराष्ट्र

लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे. लोकमत हे वाचकसंख्येनुसार मराठीतील क्रमांक एकचे वृत्तपत्र असून देशात याचा क्रमांक ४था आहे. [ संदर्भ हवा ] दर्डा कुटुंबीय या वृत्तपत्राचे मालक आहेत.

पुरवणी

लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत दररोज वेगवेगळ्या पुरवण्या देतात.

मंथन

मंथन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत रविवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

सखी

सखी ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत गुरुवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

ऑक्सिजन

ऑक्सिजन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत शुक्रवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

सी.एन.एक्स

सी.एन .एक्स ही करमणूक व मनोरंजन संदर्भातील पुरवणी असून ती सोमवार , बुधवार ,शुक्रवार व शनिवारी मुख्य अंकासोबत येते.

संदर्भ