लैला तैयबजी
लैला तैयबजी (२ मे, १९४७:दिल्ली, भारत - ) या भारतीय हस्तकलाकार आहेत. या दस्तकार या संस्थेच्या संस्थापिका आहेत.
तैयबजी यांनी देहरादून येथील वेलहॅम गर्ल्स स्कूल येथे प्राथमिक शिक्षण घेतले व नंतर वडोदरामधील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या फाइन आर्ट्स फॅकल्टीमध्ये कलाशिक्षण घेतले.
गुजरात हँडलूम अँड हँडीक्राफ्ट्स कॉर्पोरेशनने तैयबजी यांना कच्छमधील हस्तकलांचा अभ्यास करून त्यांचे पुनरुत्थान करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात काम करणे सुरू केले.