लैंगिक खच्चीकरण
लैंगिक इच्छाशक्ती कमी करणे किंवा लैंगिक क्षमता काढणे किंवा लिंगाचे समूळ उच्चाटन करण्याला लैंगिक खच्चीकरण असे म्हणतात. पुरुषांचे वृषण काढणे अथवा स्त्रीचे जननक्षम अवयव निकामी करणे अशा रितीने हे केले जाते. लैंगिक खच्चीकरण करण्याची प्रथा प्राचीन आहे. ही प्रामुख्याने मध्य आशिया आणि दक्षिण आशियात दिसून येते. शत्रूवर विजय मिळाल्यावर शत्रूचे लैंगिक खच्चीकरण केले जात असे. हा एक शिक्षेचा प्रकार होता.
गुलामी
मध्य युगात मुस्लिम व्यापारी गुलामांचा व्यापार करत. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या गुलांमांचे लैंगिक खच्चीकरण करत असत. यामुळे त्यांची किंमत वाढत असे. कारण असे गुलाम घरात ठेवायला सुरक्षित असत असे मानले जात असे. त्यांनी बायकांना गर्भार करू नये म्हणून असे केले जात असे. बगदादच्या खलिफा कडे असे आठ हजार गुलाम होते.
रासायनिक
आधुनिक पद्धतीनुसार लैंगिक गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी रासायनिक पद्धती वापरली जाते. यात गुन्हेगारांना काही रसायने ठराविक कालावधी नंतर टोचली जातात त्यामुळे त्यांची लैंगिक इच्छाशक्ती कमी होते. यात पुरूषांमधील टेस्टोस्टेरॉन या लैंगिक उत्तेजक संप्रेरकाची निर्मिती कमी होते. इ.स. १९६६ मध्ये प्रथम अमेरिकेत लैंगिक खच्चीकरणाची पद्धत वापरण्यात आली. या औषधांमध्ये सायप्रोटेरोन अॅसिटेट, डेपो प्रोव्हेरा, बेनपेरिडॉल, म्रेडोझायप्रोजेस्टेरोन अॅसिटेट, ल्युप्रोरेलिन(प्रोस्टॅप) यांचा समावेश होतो.