Jump to content

लेसोथो

लेसोथो
Muso oa Lesotho
Kingdom of Lesotho
लेसोथोचे राज्य
लेसोथोचा ध्वजलेसोथोचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Khotso, Pula, Nala" (सोथो)
शांती, पाऊस, सुबत्ता
राष्ट्रगीत: Lesotho Fatse La Bontata Rona
लेसोथो, आपली पितृभूमी
लेसोथोचे स्थान
लेसोथोचे स्थान
लेसोथोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीमासेरु
अधिकृत भाषासोथो, इंग्लिश
सरकारसांसदीय संविधानिक राजेशाही
 - राष्ट्रप्रमुखलेट्झी ३
 - पंतप्रधानटॉम थाबाने
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ४ ऑक्टोबर १९६६ (युनायटेड किंग्डमपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ३०,३५५ किमी (१४०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण २०,६७,००० (२००९) (१४६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता६८.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.२७७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२,२४४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४२७ (कमी) (१५८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनलोटी
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०२:०० (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१LS
आंतरजाल प्रत्यय.ls
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक२६६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


लेसोथो हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. लेसोथोच्या चारही बाजुंना दक्षिण आफ्रिका देशाच्या सीमा आहेत. दुसऱ्या स्वतंत्र देशाच्या पुर्णपणे अंतर्गत असलेला लेसोथो जगातील केवळ ३ देशांपैकी एक आहे (सान मारिनोव्हॅटिकन सिटी हे इतर दोन्ही देश इटलीमध्ये आहेत.) मासेरु ही लेसोथोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

१८६८ सालापासून ब्रिटिश साम्राज्याचे मांडलिक राष्ट्र राहिल्यानंतर १९६६ साली लेसोथोला स्वातंत्र्य मिळाले. सध्या लेसोथो राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे सांसदीय संविधानिक राजेशाही प्रकारचे सरकार आहे. येथील राजाला औपचारिक महत्त्व असून सर्व संविधानिक अधिकार संसद सांभाळते. लेसोथोची अर्थव्यवस्था शेती, खाणकाम, उत्पादन इत्यादी उद्योगांवर अवलंबून असून येथील ४० टक्के लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेच्या खाली जगतात.

ह्या भागातील इतर देशांप्रमाणे लेसोथोदेखील एड्सच्या मगरमिठीत अडकला आहे. २००९ मधील पाहणीनुसार येथील २३.६ टक्के लोकांना एच.आय.व्ही. विषाणूची लागण झाली आहे व येथील सरासरी आयुर्मान केवळ ४२ वर्षे आहे. एड्सचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू असून ह्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

लेसोथो आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात स्थित असून तो चारही बाजूने दक्षिण आफ्रिका देशाने वेढला गेला आहे. संपूर्णपणे १,००० मीटर (३,३०० फूट) पेक्षा अधिक उंचीवर वसलेला लेसोथो हा जगातील एकमेव स्वतंत्र देश आहे. ह्या उंचीमुळे येथील हवामान शीतल असते.

चतुःसीमा

राजकीय विभाग

लेसोथोचे १० जिल्हे

राजकीय दृष्ट्या लेसोथो १० जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

समाजव्यवस्था

लेसोथोची लोकसंख्या अंदाजे २०.६७ लाख इतकी असून येथील २५ टक्के जनता शहरी तर ७५ टक्के ग्रामीण आहे.

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे