लेबेनॉन
लेबेनॉन الجمهورية اللبنانية (अरबी) République libanaise (फ्रेंच) लेबेनॉनचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: | |||||
लेबेनॉनचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) | बैरूत | ||||
अधिकृत भाषा | अरबी | ||||
इतर प्रमुख भाषा | फ्रेंच | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | तम्माम सलाम (कार्यवाहू) | ||||
- पंतप्रधान | तम्माम सलाम | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- फ्रेंच लेबेनॉन | १ सप्टेंबर १९२० | ||||
- संविधान | २३ मे १९२६ | ||||
- स्वातंत्र्याची घोषणा | ८ नोव्हेंबर १९४३ | ||||
- फ्रान्सकडून स्वातंत्र्याला मान्यता | २२ नोव्हेंबर १९४३ | ||||
- फ्रेंच सैन्याची माघार | ३१ डिसेंबर १९४६ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १०,४५२ किमी२ (१६६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.८ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४८,२२,००० (१२३वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}} {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ४७३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ७७.४०३ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १७,३२६ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७६५ (उच्च) (६५ वा) (२०१३) | ||||
राष्ट्रीय चलन | लेबनीझ पाउंड | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | LB | ||||
आंतरजाल प्रत्यय | .lb | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ९६१ | ||||
लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
सरकार
अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.
लोकजीवन
लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.
वाहतूक
बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.
खेळ
लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.
बाह्य दुवे
- लेबानी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ (अरबी व फ्रेंच मजकूर)
- लेबेनॉनचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील लेबेनॉन पर्यटन गाईड (इंग्रजी)