Jump to content

लेना नदी

लेना
Ле́на
याकुत्स्कजवळ लेनाचे पात्र
लेना नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम बैकाल पर्वतरांग, इरकुत्स्क ओब्लास्त, रशिया
मुखलापतेव समुद्र, आर्क्टिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देशरशिया
लांबी ४,४७२ किमी (२,७७९ मैल)
उगम स्थान उंची १,६४० मी (५,३८० फूट)
सरासरी प्रवाह १६,८७१ घन मी/से (५,९५,८०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २५ लाख

लेना (रशियन: Ле́на, साखा: Өлүөнэ) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: ओबयेनिसे). लेना नदी बैकाल सरोवराच्या उत्तरेकडील बैकाल पर्वतरांगेत उगम पावते. तेथून ईशान्येकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन ही नदी आर्क्टिक महासागराला मिळते. ४,४७२ किमी लांबी असलेली लेना ही जगातील नवव्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.

साखा प्रजासत्ताकामधील याकुत्स्क हे लेनावरील सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत