Jump to content

लुईजी पिओ तैस्सितोरी

लुईजी पिओ तैस्सितोरी

लुईजी पिओ तैस्सितोरी (जन्म : १३ डिसेंबर, इ.स. १८८७ उदेन, इटली मृत्यू : इ.स. १९१९ बिकानेर, राजस्थान) हा एक भाषाशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होता. प्राचीन भारतीय लिपी संशोधनात त्याने काम केले.

योगदान

  • रामचरितमानस व रामायण - तैस्सितोरी याने इटलीमध्ये राहून महाकवी वाल्मिकीकृत रामायणतुलसीदासकृत रामचरितमानस यांचे तुलनात्मक अध्ययन या विषयावर शोधकार्य करून पीएच्.डी. ही उपाधी मिळविली. हे त्याचे शोधकार्य प्रथम इटालियन भाषेत प्रकाशित झाले.
  • पश्चिमी राजस्थानी व्याकरण - हा तैस्सितोरी याचा ग्रंथ इ.स. १९१४ साली प्रकाशित झाला.
  • तैस्सितोरी याने आपले गुरू जैनाचार्य श्री विजयधर्मसूरी याचे जीवनचरित्र इंग्रजीत लिहून इंडियन अँटिक्वेरीमध्ये प्रकाशित केले.
  • परम ज्योति स्तोत्र आणि सिद्धसेन दिवाकरचे कल्याण मंदिर स्तोत्र यांचे प्राचीन ब्रजभाषेत रूपांतर केले.
  • क्या धर्मदास गणी महावीर के समकालीन थे ? हा त्याने इंग्लिश भाषेत लिहिलेला लेख जोधपूर येथे इ.स. १९१४ साली झालेल्या जैन साहित्य संमेलनात वाचला.
  • 'वाचवनिका राठौर रतन महेशदासोत री', 'रिवडीया जग्गा री कही', 'वेली किसन रुक्मिणी री' आणि 'छंद राव जैतसी रो' या ग्रंथांचे संपादन तैस्सितोरी याने केले.
  • करकन्डु कथा - करकन्डु कथा हा राजस्थानच्या जयपुरी भाषेतील ढूंढारी बोलीभाषेचा ग्रंथ आहे. त्याचा तैस्सितोरी याने इटालियन भाषेत अनुवाद केला.
  • भव वैराग्य शतकम - 'भव वैराग्य शतकम' या संस्कृत भाषेतील ग्रंथाचा तैस्सितोरी याने इटालियन भाषेत अनुवाद केला.