Jump to content

ली ना

हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.
ली ना
२०१० श्टुटगार्ट स्पर्धेमध्ये ली ना
देशFlag of the People's Republic of China चीन
वास्तव्यवूहान, हूपै
जन्म २६ फेब्रुवारी, १९८२ (1982-02-26) (वय: ४२)
वूहान
उंची १.७२ मी
सुरुवात इ.स. १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $१,३२,९९,१८९
एकेरी
प्रदर्शन 503–188
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३ (२८ ऑक्टोबर २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२०१४)
फ्रेंच ओपनविजयी (२०११)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२००६, २०१०, २०१३)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२०१३)
दुहेरी
प्रदर्शन 121–50
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५४
शेवटचा बदल: जाने २०१३.


पदक माहिती
चीनचीन या देशासाठी खेळतांंना
आशियाई खेळ
सुवर्ण२०१० क्वांगचौसंघ
कांस्य२००६ दोहाएकेरी

लि ना अथवा ली ना (चिनी: 李娜; फीनयीन: Lǐ Nà, फेब्रुवारी २६, इ.स. १९८२) ही चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. जानेवारी, इ.स. २०११मध्ये तिने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. किम क्लिस्टर्स हिने तिला अंतिम सामन्यात हरवल्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र लगेचच जून, इ.स. २०११मध्ये फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटालियन टेनिस खेळाडू फ्रांचेस्का स्क्यावोने हिला अंतिम फेरीत हरवत तिने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये एकेरीचे अजिंक्यपद पटकावणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली.

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या इ.स. २००६ सालातील मोसमात उपउपांत्य फेरीत पोचून अशी कामगिरी करणारी पहिली चिनी खेळाडू होण्याचा मान तिने पटकावला. इ.स. २००९ सालातील अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत, तर इ.स. २०१० साली पुन्हा एकदा विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत तिने उपउपांत्य फेरीपर्यंत दौड मारली.

२०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजय मिळवून ली ने आपले दुसरे एकेरी ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवले.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी२०११ऑस्ट्रेलियन ओपनहार्डबेल्जियम किम क्लाइस्टर्स6–3, 3–6, 3–6
विजयी२०११फ्रेंच ओपनक्लेइटली फ्रांचेस्का स्कियाव्होनी6–4, 7–6(7–0)
उपविजयी२०१३ऑस्ट्रेलियन ओपनहार्डबेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का6–4, 4–6, 3–6
विजयी२०१४ऑस्ट्रेलियन ओपनहार्डस्लोव्हाकिया डॉमिनिका सिबुल्कोवा7–6(7–3), 6–0

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत