Jump to content

लिम कोक विंग

लिम कोक विंग
जन्म १९४५
क्वालालंपूर, मलेशिया
मृत्यू १ जून २०२१
पेशा व्यापारी, परोपकारी, शिक्षक आणि चित्रकार

लिम कोक विंग (中國武術; १९४५ – १ जून २०२१) हा मलेशियन व्यापारी, परोपकारी, शिक्षक आणि चित्रकार होता. लिमकोकविंग युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचा तो संस्थापक होता.

प्रारंभिक जीवन

लिमचा जन्म १९४५ मध्ये क्वालालंपूर, मलेशिया येथे झाला. त्याने मेथोडिस्ट बॉईज स्कूल आणि कोचरेन रोड माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले.[]

कारकिर्द

सायबरजाया, मलेशिया मधील लिमकोकविंग युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, डिसेंबर २००७ मध्ये काढलेला फोटो

स.न १९७५ मध्ये, वयाच्या २९ व्या वर्षी, लिमने विंग्ज क्रिएटिव्ह कन्सल्टंट्स ही जाहिरात फर्म स्थापन केली.[] स.न १९९२ मध्ये त्यांने सायबरजया येथे लिमकोकविंग युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना केली.[] त्याने अध्यक्ष म्हणूनही काम केले. जुलै २००७ मध्ये, लिमकोकविंग विद्यापीठ बोत्सवानाच्या स्थापनेनंतर, लिमने देशाच्या संसदेला संबोधित केले. त्याच वर्षी, लिमकोक्विंग विद्यापीठ लंडनची स्थापना झाली.[] जून २०२० मध्ये, लिमकोकविंग युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीने "आफ्रिकेचा राजा" म्हणून लिमचे चित्रण करणारा एक बिलबोर्ड कार्यान्वित केला. त्या चित्रामध्ये त्याला चित्ताने वेढलेले आणि आफ्रिकन विद्यार्थ्यांनी वेढलेले दाखवले आहे.[][] खराब ऑनलाइन रिसेप्शनमुळे ते नंतर काढून टाकण्यात आले.[]

मृत्यू

लिम यांचे १ जून २०२१ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.[] घरात पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.[] त्याच्या मृत्यूने मलेशियाचे लोक फार दुःखी झाले. स्थानिक वृत्तपत्र द स्टारने त्यांचे वर्णन "उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी एक" म्हणून केले.[] तर युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन (आय आय टी ई) ने लिम यांना "शिक्षण आणि परोपकारातील महान व्यक्ती" म्हणले. [] महाथिर मोहम्मद यांनी टिपणी केली की लिम हे "मलेशियन व्हिजनचे उत्कट समर्थक" होते, तर नजीब रझाक यांनी नमूद केले की त्यांनी "अनेकांचे जीवन बदलले".[१०]

ओळख

लिम यांना त्यांच्या उद्योजकता आणि परोपकार या दोन्हीसाठी अनेक पुरस्कार मिळाले. स.न २००६ मध्ये, मलेशिया कॅनडा बिझनेस कौन्सिलने त्यांना सीईओ ऑफ द इयर म्हणून निवडले. स.न २००७ मध्ये, त्यांना मॉस्को अकादमी ऑफ द स्टेट आणि म्युनिसिपल मॅनेजमेंटने मानद प्राध्यापकपद बहाल केले.[११]

संदर्भ

  1. ^ a b c Wong 2012, पान. 640.
  2. ^ Wong 2012, पान. 639.
  3. ^ Tan, Mei Zi (10 June 2022). "Malaysians demand removal of 'dehumanising' billboard portraying Lim Kok Wing as 'King of Africa'". Malay Mail.
  4. ^ Sukumaran, Tashny (20 June 2020). "'King of Africa' billboard sparks racism claims at university started by Chinese-Malaysian". South China Morning Post.
  5. ^ Moey, Melina (12 June 2020). "Angry netizens petition to remove billboard portraying Lim Kok Wing as 'King of Africa'". AsiaOne.
  6. ^ Basyir, Mohamed (1 June 2021). "Lim Kok Wing dies at 75". New Straits Times.
  7. ^ "Lim Kok Wing recuperating after suffering from fall". The Star. 25 May 2021.
  8. ^ Rajaendram, Rebecca; Menon, Sandhya (2 June 2021). "Tributes and condolences pour in for Lim Kok Wing". The Star.
  9. ^ Menon, Sandhya (3 June 2021). "Unesco's ITTE saddened, shocked by Lim Kok Wing's death". The Star.
  10. ^ "Tan Sri Dato Sri Paduka Dr. Limkokwing: Tributes from Global Leaders". Limkokwing University. 1 November 2021. 6 September 2022 रोजी पाहिले.
  11. ^ Wong 2012, पान. 642.

संदर्भग्रंथ

  •  Wong, Seet Leng Mei (2012). "Lim Kok Wing". In Leo Suryadinata (ed.). Southeast Asian Personalities of Chinese Descent: A Biographical Dictionary, Volume I & II. Institute of Southeast Asian Studies. pp. 639–642. ISBN 9789814345217.

बाह्य दुवे