लिम्फोसाईट्स
लिफ्मोसाईट्स या पांढऱ्या रक्त पेशीच्या एक प्रकार आहे. त्या प्रतिकार शक्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतात.
आकार
त्या गोलाकार पांढऱ्या रक्त पेशी असतात. त्यांचा व्यास ७-८ मायक्रॉन असते.
त्यांचे पांढऱ्या रक्त पेशीतील प्रमाण २५% ते ४०% असते.
प्रकार
लिफ्मोसाईट्चे खालील प्रकार आहेत.
- 'टी' पेशी
- 'बी' पेशी
- 'एनके' नॅचरल किलर किंवा नैसर्गिक विध्वंसक पेशी
लिफ्मोसाईट्सचे प्रमाण वाढलेले असणारे आजार
- विषमज्वर(टायफॉईड)
- रक्ताचा कर्करोग(ल्युकेमिया)
- विषाणूजन्य आजार
लिफ्मोसाईट्सचे प्रमाण कमी असणारे आजार
- एड्स किंवा एच्आयव्ही