ला प्लाटा पीक
ला प्लाटा पीक | |
---|---|
ला प्लाटा पीक | |
१४,३६८ फूट (४,३७९ मीटर) | |
कॉलोराडो, रॉकी माउंटन्समध्ये चौथा | |
शेफी काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
सावाच पर्वतरांग | |
39°01′46″N 106°28′22″E / 39.02944°N 106.47278°E | |
इ.स. १८७३ | |
वायव्य धार किंवा आग्नेय धार |
ला प्लाटा पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,३६८ फूट (४,३७९ मीटर) उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर लेडव्हिलपासून ३२ किमी (२० मैल) आग्नेयेस आहे.
ला प्लाटा पीकचा स्पॅनिश भाषेत अर्थ चांदीचे शिखर होतो. या डोंगराच्या आसपास आढळणाऱ्या चांदीच्या खाणींवरून हे नाव देण्यात आले.