Jump to content

ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ

ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GUAआप्रविको: MGGT) ग्वातेमाला देशातील ग्वातेमाला सिटी शहराचा मुख्य विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ६ किमी दक्षिणेस असलेला हा विमानतळ मध्य अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६मध्ये २७,५९,३४७ प्रवाशांनी येथून ये-जा केली.

येथून मध्य अमेरिकेतील प्रमुख शहरांना तसेच उत्तर अमेरिका आणि युरोपच्या निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या वायुसेनेने येथे आपल्या तीन स्क्वॉड्रन तैनात केल्या होत्या. मध्य अमेरिकेतील बंदरांचे अक्ष राष्ट्रांच्या पाणबुड्यांपासून रक्षण करण्यासाठी ही विमाने येथून आणि इतर काही विमानतळांवरून उड्डाणे करीत.

४ जून, २०१८ रोजी जवळच्या व्होल्कान दे फुएगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा विमानतळ बंद केला गेला होता.