लाल बुडाचा बुलबुल
शास्त्रीय नाव | Pycnonotus cafer |
---|---|
कुळ | वल्गुवदाद्य (Pycnonotidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Red-vented Bulbul |
संस्कृत | कृष्णचूड |
हिंदी | बुलबुल, गुल्दुम |
आकार
लाल बुडाचा बुलबुल हा साधारण २० सें. मी. (८ इं) आकाराचा पक्षी आहे.
आवाज
शरीररचना
या बुलबुलचा मुख्य रंग धुरकट तपकिरी असून याच्या डोक्याचा रंग काळा असून त्यावर लहान शेंडी असते. याच्या पाठीवर आणि छातीवर तुटक रेषांसारख्या खुणा असतात तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो जो उडतांना स्पष्ट दिसतो. याची मुख्य ओळख म्हणजे याचा पार्श्व भाग लाल रंगाचा असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
वास्तव्य
लाल बुडाचा बुलबुल संपूर्ण भारतासह बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार येथील उष्णकटिबंधीय वनात, झुडपी जंगलात, शेतीच्या प्रदेशात, बागेत, जोडीने किंवा लहान थव्यात राहणारा पक्षी आहे. हा पक्षी माणसाच्या वस्तीजवळ आणि दूरही राहतो.
प्रजाती
याच्या रंग आणि आकारावरून किमान ७ उपजाती आहेत.
खाद्य
विविध कीटक, फळे, दाणे, मध , द्राक्षे हे बुलबुलचे मुख्य खाद्य आहे.
प्रजनन
फेब्रुवारी ते मे हा कालावधी या बुलबुलचा विणीचा काळ असून जमिनीपासून १ ते १० मी. उंच झाडावर यांचे गवताचे, खोलगट घरटे असते. मादी एकावेळी २-३ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे मिळून करतात.
चित्रदालन
- लाल बुडाचा बुलबुल
- लाल बुडाचा बुलबुल
- लाल बुडाचा बुलबुल
- बुलबुल जोडी
- घरटे व अंडी