लालमहाल महोत्सव
पुणे महानगरपालिकेच्या वतीने गेली चार वर्षांपासून लालमहाल महोत्सव होत असून, त्यामध्ये शिवाजीच्या चरित्रावर व्याख्याने, प्रबोधन कविसंमेलने, नाटके आदी कार्यक्रम होतात. याशिवाय, ’रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम आणि मुलांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिवमहोत्सव समितीचे अध्य़क्ष रवींद्र माळवदकर व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आग्रहाने हा लालमहाल महोत्सव सुरू झाला आहे. त्यासाठी सुरुवातीला संतोष शिंदे, मुकुंद काकडे, ज्ञानेश्वर मोळक, भाई कात्रे, दशरथ यादव, किशोर ढमाले, संजय शिरोळे, अजय पवार, प्रवीण गायकवाड, शिवाजी हुळवळे, अनिल पाटील, शिवाजी दुगे, विठ्ठल गायकवाड आदी सुमारे शंभर जणांनी प्रामुख्याने प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच हा लालमहाल महोत्सव सु्रू झाला.[ संदर्भ हवा ]