लालकृष्ण अडवाणी
लालकृष्ण अडवाणी | |
विरोधी नेता | |
विद्यमान | |
पदग्रहण जून १ इ.स. २००४ | |
मागील | सोनिया गांधी |
---|---|
कार्यकाळ जून २९ इ.स. २००२ – मे २० इ.स. २००४ | |
पंतप्रधान | अटलबिहारी वाजपेयी |
मागील | देवीलाल (उप पंतप्रधान १९९१पासून) इंद्रजीत गुप्ता (गृहमंत्री) |
पुढील | पद बरखास्त (उप पंतप्रधान) शिवराज पाटील (गृहमंत्री) |
जन्म | नोव्हेंबर ८ इ.स. १९२७ कराची, ब्रिटिश राज |
व्यवसाय | वकील |
लालकृष्ण अडवाणी ( नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
ते इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.
साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार