Jump to content

लाईफलाईन (मराठी चित्रपट)

लाईफलाईन
दिग्दर्शन साहिल शिरवईकर
निर्मिती लालाजी जोशी, कविता शिरवाईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री, क्रेसेंडो एंटरटेनमेंट[]
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २ ऑगस्ट २०२४
अवधी १२७ मिनिटे


लाईफलाईन हा एक २०२४ सालचा मराठी भाषेतील चित्रपट आहे.[][] या चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी. केले असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे.[] कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे असून निर्मितीची जबाबदारी लालाजी जोशी, कविता शिरवाईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रेसेंडो एंटरटेनमेंट यांची आहे. या चित्रपटाला संगीत अशोक पत्की यांनी दिले असून अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी यातील गाणी गायली आहेत.[]

कथानक

कर्मठ आणि अहंकारी असे किरवंत पंडीत केदारनाथ अग्निहोत्री आणि डॅा. विक्रम देसाई यांच्या दरम्यान फिरणारी ही कथा आहे. अवयवदान करून मृत्यूपश्चात देखील जीवंत राहता येते अशी जनजागृती डॉ देसाई करत असतात. त्यांनी आजपावेतो अवयव प्रत्यारोपण करत कित्येक जणांना जीवदान दिले आहे. याउलट पंडीत केदारनाथ मात्र अवयवदानाला विरोध करत असतात. शेवटी कथानक पुढे वेगवेगळे वळण घेत जाते, अशा आशयाचा हा चित्रपट आहे.[]

कलाकार

संदर्भ

  1. ^ a b c "ज्ञान-विज्ञानाचा एके ठायी मेळ! कसा आहे अशोक सराफ-माधव अभ्यंकर यांचा 'लाईफलाईन' सिनेमा?". दैनिक लोकमत. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b "अशोक सराफ यांचा 'लाईफलाईन' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; चित्रपटाचा टीझर पाहिलात का?". tv9marathi.com. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार? दिग्गजांच्या अभिनयाची जुगलबंदी, 'लाईफलाईन'चा ट्रेलर लाँच". एबीपी मराठी. २ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.