Jump to content

लाइन नदी

लाइन / लाइनऽ
हानोफरजवळील लाइनऽ नदीचे दृश्य
उगम थुरिंजिया
पाणलोट क्षेत्रामधील देशजर्मनी
लांबी २७१ किमी (१६८ मैल)
ह्या नदीस मिळते आलर

लाइन नदी (किंवा लाइनऽ नदी) जर्मनीच्या थुरिंजिया व लोअर सॅक्सनी प्रांतातून वाहणारी एक नदी आहे.

हिचे मूळ थुरिंजियातील लाइनफेल्ड गावाजवळ आहे. तेथून ४० कि.मी. वाहून ही नदी लोअर सॅक्सनी प्रांतात शिरते व उत्तरेकडे वाहते.

या नदीच्या काठावर ग्यॉटिंगन, आइनबेक, आल्फेल्ड, ग्रोनाऊ व हानोफर ही शहरे आहेत.