लांघणज
लांघणज हे गुजरात राज्यातील महेसाणा जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. इ.स. १९४१ ते इ.स. १९६३ या कालावधीत याठीकाणी केल्या गेलेल्या उत्खननात आंतर अश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळले. त्यात मानवी सांगाडे,गारगोटीची लहान हत्यारे,मृदभांडी सापडली. मृतांचे एकूण तेरा सांगाडे उत्खननातून मिळाले. हे सांगाडे हातपाय दुमडून उत्तर-दक्षिण अशा स्थितीत पुरलेले मिळाले.[१] लांघणजला सापडलेल्या आंतराश्मयुगीन संस्कृतीच्या तारखा कार्बन १४ पद्धतीनुसार इ.स.पू. २५८५ ते २१५० अशा आलेल्या आहेत.