ललित सोनोने
JJwiki108.208 (चर्चा) १३:१८, ४ मार्च २०२१ (IST)
ललित सोनोने | |
---|---|
जन्म नाव | लिलाधर महादेवराव सोनोने |
टोपणनाव | ललित सोनोने |
जन्म | ऑक्टोबर ११ , १९३८ गुंजी ,धामणगांव ,अमरावती, महाराष्ट्र |
मृत्यू | फेब्रुवारी १ ,२०२१ गुंजी,धामणगांव, अमरावती, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | काव्य, साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, गझल |
प्रसिद्ध साहित्यकृती | चांदणवेल ,एक वलय दुःखाचे |
अपत्ये | चारुशीला,चित्ररेखा,नीलिमा,प्रशांत,संदीप |
ललित सोनोने यांचा जन्म अमरावती जिल्ह्या नजीक च्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी येथे ११-१०-१९३८ला झाला. आजोबांच्या काळापासूनच त्यांच्या घरात निरामय असे धार्मिक वातावरण होते म्हणून वडिलांना भजनाचा छंद होता. ते चांगले तबलावादकहि होते. अश्या वातावरणात सूर ,ताल व शब्द त्यांच्या मनात खोलवर रुजू होत गेले.[१]
कविभूषण अण्णासाहेब खापर्डे यांच्या नंतर कविवर्य मधुकर केचे , गझलसम्राट सुरेश भट,शरदचंद्र सिंन्हा ,उ.रा.गिरी ,तुळशीराम काजे ,मनोहर तल्हार , बाबा मोहोड, श्याम सोनारे या कवींच्या सहवासात त्यांना काव्यलेखना कडे विशेष आकर्षण झाले आणि छंदबद्ध कविता लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली.
होस्टेलवरच असतांना टाकळगांवचे जगन वंजारी हे त्यांचे मित्र बनले. ते त्यांचे नातेवाईकही होते. साहित्याची आवड लागत गेली व वाचन सुरू झाले .
१९५८ला अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात बी.ए च्या प्रथम वर्षला शिकत असतांना महाविद्यालयात सुरेश भट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कवीसंमेलनात त्यांनी आपली कविता सादर केली या कवितेला मिळालेली सुरेश भटांची दाद व "तू छान कविता लिहितोस .आता नव्याने काळजाचा ठाव घेणारी गझल लिहायला लाग " हा सल्ला त्यांना प्रोत्साहन देणारा ठरला .
वर्ष १९६३ ते ६७ ह्या काळात वडील व आई यांचे निधन झाले त्यामुळे नैराश्याग्रस्थ होऊन त्यांनी काव्यलेखनाला विराम देण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचे जीवलग मित्र साहित्यिक व पत्रकार जगन वंजारी हे त्यांना भेटायला त्यांच्या गावी आले व "तू शब्दसृष्टीचा कलावंत आहेस. तुला तुझ्या कवितेचे महत्त्व वाटत नसले तरी माझ्यासारखे कित्तेक रसिक तुझ्या कवितेवर जीव ओवाळून टाकतात " असे म्हणून त्यांनी ललित सोनोने यांना पुन्हा गझल व कविता लिहिण्यास मनवले व ते पुन्हा जोमाने कविता लिहायला लागले.
त्यांनी १९८९ साली आपला पहिला कवितासंग्रह 'चांदनवेल ' प्रकाशित केला.अर्धांगिनीच्या मृत्यू नंतर त्यांना एकाकीपण जाणवू लागले मात्र या पुढे जाऊन २०१२ मध्ये 'एक वलय दुःखाचे ' हा गझलसंग्रह प्रकाशित केला .
अलीकडेच त्त्यांची कविता अमरावती विद्यापीठाच्या बी.कॉमच्या ३ ऱ्या वर्षीच्या अभयसक्रमातही सामील करण्यात अली. गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध अ.भा.मराठी गझल साहित्य संमेलना पासून येत गेला होताच त्यांचे ललित सोनोने बद्दलचे मनोगत एक वलय दुःखाचे या पुस्तकामध्ये वाचायला मिळते.
जेव्हा जगन वंजारी साहित्य जत्रा चालवायला लागले तेव्हा त्यांनी सोनोनेंच्या बऱ्याच कविता व गझला प्रकाशित करून त्यांना भरपूर प्रसिद्धी दिली डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दै .लोकमतने काढलेल्या एका खास पुरवणीच्या कव्हर पेज वर त्यांची 'ज्ञानसूर्य ' ही गझल प्रकाशित झाली.
प्रकशित पुस्तके
- चांदणवेल (१९८९) (कविता व गझल संग्रह )
- एक वलय दुःखाचे (०१-०८-२०१२)(गझल संग्रह )
स्वरबद्ध गझला
- फुलांतला प्रवास दे ( गायक -मयूर महाजन संगीत- सुधाकर कदम )
- आमचा सूर्य होऊन आलास तू (गायक -संगीत अनिल खोब्रागडे)
- किती युगातला (गायक -संगीत अनिल खोब्रागडे)
निधन
दिनांक १ फेब्रुवारी २०२१ला त्याच्या राहत्या गावी गुंजी येथे त्याचे दीर्घ आजाराने निधन झाले .
काही प्रसिद्ध गझला
ज्ञानसूर्या | फुलातला प्रवास दे | चांदणवेल |
---|---|---|
ज्ञानसूर्या आंधळे आकाश तू फाडून गेला ! क्रांतिचे तेजाब तू तेजातुनी सांडून गेला ! सावल्या गावकुसाबाहेरच्या होत्या अभागी, जीर्ण भिंती क्षुद्रतेच्या खालती पाडून गेला ! पेटाता ज्वालामुखी तू पेटुनी उठला असा की, ही अमानुषता रुढींची येथल्या गाडून गेला ! तू लिहूनी टाकिला इतिहास रक्ताने मुक्यांचा , अन महाडाच्या तळ्याचा ऊर ओसंडून गेला ! द्यावया पुर्णत्व हे अस्तित्व लुटल्या माणसांना , बांधलेला पाश स्पर्शाचे जुने तोडून गेला ! फेडिले तू पांग घटनाशिल्प कोरून मायभूचे, दिव्य मुक्तिलेख भाळी आमच्या मांडून गेला ! जन्मलो तेव्हाच होता साचला अंधार नेत्री , तूच प्रज्ञा शील करुणेचा दिवा धाडून गेला ! मोडले आयुष्य पण तू वाकला नाही जरासा , येथले आकाश अन् पातळ तू जोडून गेला! | तुझ्यासवे सखे मला फुलातला प्रवास दे ! सरु नये कधी पुन्हा असा मला सुवास दे ! लपून आरसा तुझा खुणावतो किती मला , सदैव डोळियांपुढे तुझाच दिव्या भास दे ! कळायचे कासे तुला ऋतूविणा फुलरणे , तुझा वसंत सारखा मिठीत बार मास दे ! रिते अबोल ओठ हे अधीर केवढे तरी , हळूच अमृतातला मधुर एक घास दे ! शाहरले कशामुळे तुझ्या मनातले झरे , करून चिंब तू मला जळातला विलास दे ! अजून शुक्र चांदणी नभात का तुझ्या झुरे ? पहाटचा तुझ्यात मी प्रकाश या जिवास दे ! | चांदणवेल ही फुलते ग चंद्रपाखरू झुलते ग निळ्या तळ्यावर संथ जलावर भरली घागर कळते ग किरणांचे बन हलते ग काळीज अलगद उलते ग पहाटवेडा धुंद केवडा नागीण पिवळी डुलते ग सुगंध वादळ सलते ग मनात येई भलते ग चंचलवेळी स्पर्श नव्हाळी यौवन कवळे खुलते ग नाचण पाय उचलते ग घुंगुर गीत उकलते ग जीब झुंकारून ताणू शृंगारून नाद बावरी चलते ग प्रीती खुळी किलबिलते ग मिठीत ओळख भुलते ग चिंब कळ्यातून दंब डोळ्यातून स्वप्न रुपेरी फलते ग |
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ author/online-lokmat (2021-02-01). "प्रसिद्ध गझलकार ललित सोनोने यांचे निधन". Lokmat. 2021-02-08 रोजी पाहिले.