ललिता देसाई
ललिता देसाई ऊर्फ आशू या एक मराठी नाट्य-चित्रपटअभिनेत्री आहेत. त्या दादा कोंडके यांच्या सहकारी असत.
आशू या आचार्य अत्र्यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत.
अत्र्यांच्या ’लग्नाची बेडी'चे अनेक नामवंत कलावंतांच्या संचांत हजारो प्रयोग झाले. त्यातील ’रश्मी' या सिनेनटीच्या भूमिकेला लोकप्रिय आणि संस्मरणीय करण्यात नटवर्य बापूराव मान्यांपासून स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण, अश्विनी भावे यांच्याबरोबर आशू यांचाही वाटा आहे.
ललिता देसाई यांना मिळालेले पुरस्कार
- भार्गवराम आचरेकर पुरस्कार