लपाछपी
लपाछपी किंवा लपंडाव हा मुलांचा लोकप्रिय खेळ आहे जो कमीत कमी दोन (सामान्यतः तीन किंवा जास्त) खेळाडूंसोबत खेळाला जातो. यामध्ये निवडलेला एक खेळाडू डोळे बंद करून पूर्वनिर्धारित संख्येपर्यंत मोजतो आणि तोपर्यंत इतर खेळाडू ठरवलेल्या निश्चित प्रदेशात लपतात. संख्या मोजून झाल्यावर निवडलेला खेळाडू "आलो रे आलो" म्हणतो आणि लपलेल्या खेळाडूंना शोधतो. शोधणाऱ्या खेळाडूवर राज्य आहे असे म्हणतात. सगळे लपलेले खेळाडू सापडल्यावर खेळ संपतो. जो खेळाडू पहिल्यांदा सापडतो, तो हरतो आणि पुढच्या डावात त्याच्यावर राज्य येते.
जगभरात वेगवेगळ्या नावांनी या खेळाचे विविध प्रकार खेळले जातात.