लदोगा सरोवर
लदोगा सरोवर स | |
---|---|
स्थान | वायव्य रशिया (लेनिनग्राद ओब्लास्त व कॅरेलिया) |
गुणक: 61°00′N 31°30′E / 61.000°N 31.500°Eगुणक: 61°00′N 31°30′E / 61.000°N 31.500°E | |
प्रमुख अंतर्वाह | स्विर नदी, वोल्खोव नदी, वोक्सी नदी |
प्रमुख बहिर्वाह | नेव्हा नदी |
पाणलोट क्षेत्र | २,७६,००० वर्ग किमी |
भोवतालचे देश | रशिया |
कमाल लांबी | २१९ किमी (१३६ मैल) |
कमाल रुंदी | १३८ किमी (८६ मैल) |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | १७,७०० चौ. किमी (६,८०० चौ. मैल) |
सरासरी खोली | ५१ मी (१६७ फूट) |
कमाल खोली | २३० मी (७५० फूट) |
पाण्याचे घनफळ | ८३७ किमी३ (२०० घन मैल) |
उंची | ५ मी (१६ फूट) |
लदोगा सरोवर (रशियन: Ла́дожское о́зеро; फिनिश: Laatokka) हे युरोप खंडामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. रशियाच्या वायव्य भागात सेंट पीटर्सबर्ग शहराजवळ लेनिनग्राद ओब्लास्त व कॅरेलिया ह्या विभागांमध्ये स्थित आहे. एकूण १७,८९१ चौरस किमी पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेले लदोगा जगातील १४व्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे.
रशियामधील अनेक लहान-मोठ्या नद्या लदोगाला येऊन मिळतात. नेव्हा ही नदी लदोगामधून उगम पावणारी नदी सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये फिनलंडच्या आखाताला मिळते. रशियामधील अनेक कृत्रिम कालव्यांद्वारे बाल्टिक समुद्रापासून लदोगामार्गे वोल्गा नदीपर्यंत जलवाहतूक शक्य आहे.
- विस्तृत दृष्य